Gold Rate : सोन्याचे दर आठवड्यात वाढले की घटले? सोनं खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, बाजारात काय घडलं?
Gold Rate : अमेरिकेचं आर्थिक धोरण आणि शेअर बाजारात सध्या तेजी असली तरी सोन्यातील गुंतवणुकीला लोक प्राधान्य देत असल्याचं चित्र आहे.

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा तेजी आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर या आठवड्यात सोन्याचे दर वाढले आहेत. मात्र, एक दिलासादायक गोष्ट म्हणजे सोन्याचे दर सर्वोच्च पातळीपेक्षा कमी आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 30 मे जून ते 6 जून या कालावधीत 1200 रुपयांनी वाढले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 ऑगस्टला एक्सपायरी असलेल्या वायद्याच्या 10 ग्रॅम सोन्याचे दर 30 मे 2025 ला 95875 रुपये इतकी होती. 6 जून रोजी सोन्याचा दर 97051 रुपयांवर पोहोचली आहे. वायदे बाजारात सोन्याचे दर 1176 रुपयांनी वाढले आहेत. एप्रिल महिन्यात सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या वर गेले होते.
देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर देखील वाढले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 30 मे रोजी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 95355 रुपये इतका होता. तर, 6 जूनला 10 ग्रॅम सोन्याचा दर 97150 रुपयांवर पोहोचला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत सोन्याचे दर 1795 रुपयांनी वाढले आहेत.
सोन्याचे दर
24 कॅरेट सोनं : 97150 रुपये
22 कॅरेट सोनं : 94810 रुपये
20 कॅरेट सोनं : 86460 रुपये
18 कॅरेट सोनं : 78690 रुपये
14 कॅरेट सोनं : 62660 रुपये
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून प्रत्येक दिवशी सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जातात. या दरांमध्ये जीएसटी आणि कारागिरांचं शुल्क याचा समावेश नसतो. इंडियन बुलियन ज्वेलर्स जारी केलेले दर सर्वत्र सारखे असतात.
सोने आणि चांदीचे दर एक मिस्ड कॉल देऊन तपासता येतात. यासाठी 8955664433 या क्रमांकावर फोन करावा लागेल. मिस्ड कॉल केल्यानंतर एसएमएसद्वारे दर कळवले जातात.इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या.
सोन्याचे दर उत्पादन शुल्क, राज्य सरकारांचे कर, मेकिंग चार्जेस यामुळं बदलत असतात. सोन्याचे दागिणे बनवण्यासाठी 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. दागिण्यांवर कॅरेटनुसार हॉलमार्क असतो. 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असतं. 23 कॅरेटवर 958 , 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असं लिहिलेलं असतं.
सोने दराचा यंदा उच्चांक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमकपणे आयात शुल्क लादण्यास सुरुवात केली होती. यामुळं शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. या अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणूक वाढवली होती. यामुळं सोन्याची मागणी वाढत होती. एकीकडे जागतिक परिस्थितीमुळं वाढणारे सोन्याचे दर आणि भारतातील लग्नसराईमुळं वाढणाऱ्या मागणीमुळं सोन्याचे दर वाढत होते. आता शेअर बाजारात तेजी असून देखील सोन्याचे दर वाढत आहेत, असं पाहायला मिळालं. एप्रिल महिन्यात सोन्याच्या दरानं एक लाख रुपयांचा टप्पा पार केला होता.
Before You Go
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या





















