Gold Rate: सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रूपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितळा दर जीएसटीसह 61 हजारांवर
जागतिक पातळीवर बँकांच्या व्याज दरात वाढ झाल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँकाकडे वळल्यानेत्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाली आहे.
![Gold Rate: सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रूपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितळा दर जीएसटीसह 61 हजारांवर Gold Rate Drop in gold rate by two thousand rupees price of gold 10 gram to 61 thousand including GST Gold Rate: सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रूपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितळा दर जीएसटीसह 61 हजारांवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/e50d7d26d28f8345308462f325ca8e321686803785599572_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Price : जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत (Gold Rate) घट झालीय. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. गेला आठवडाभरात दहा ग्राम सोन्याचे दर 63 हजार 300 रुपयांवरून 61 हजार 300 रुपये झाली. म्हणजे तब्बल दोन हजार रुपयांची मोठी घसरण झालीये. लग्नसराईचा सीजन संपता संपता दरात झालेली घसरण ग्राहकांना दिलासा देणारी आहे.
जागतिक पातळीवर बँकांच्या व्याज दरात वाढ झाल्याने अनेक गुंतवणूकदार हे बँकाकडे वळल्यानेत्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या आठवडाभरात दहा ग्राम सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. जागतिक पातळीवर घडलेल्या अनेक घडामोडींचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी काही प्रमाणत शेअर बाजारात पैसे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यामुळे सोन्याच्या मागणीत काही प्रमाणात घट झाल्याने त्याचा परिणाम सोन्याचे दर कमी होण्यावर झाला आहे.
सोन्याचे दर जीएसटीसह 61 हजारांवर
आठवडाभरापूर्वी दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी जीएसटीसह 63,300 रुपये मोजावे लागत होते. आता हेच दर 61,300 हजार रुपयांवर आले आहे. म्हणजेच सोन्याच्या दरात 2000 रुपयांची घट झाली असल्याचं पाहायला मिळत असल्याचं सोने व्यावसायिकांनी म्हटलं आहे.
दर आणखी कमी होण्याची ग्राहकांची अपेक्षा
दुसरीकडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या दृष्टीने सोन्याचे दर कमी झाल्याने आनंद झाला असला तरी तो आनंद व्यक्त करता येईल एवढे सोन्याचे दर कमी झालेले नाहीत. सोन्याच्या दरात अजून घट व्हायला पाहिजे होती अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे.
तुमच्या शहरातील सोन्याचे दर असे तपासा!
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.
हे ही वाचा :
सोन्याच्या गुंतवणुकीसाठी कोणते आहेत उत्तम पर्याय?, कसा आहे डिजिटल गुंतवणुकीचा पर्याय
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)