आज पुन्हा सोन्याला झळाळी, 10 ग्रॅमसाठी किती पैसे? जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळं जागतिक बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण आहे. यामुळं गुंतवणूकदारांना स्वतःचे संरक्षण करायचे आहे.

Gold Prices News : अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळं (America China trade war) जागतिक बाजारपेठेत गोंधळाचे वातावरण आहे. यामुळं गुंतवणूकदारांना स्वतःचे संरक्षण करायचे आहे. याचा परिणाम म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या अनपेक्षित वृत्तीमुळं मंदीचा धोका वाढत चालला आहे. डॉलर कमजोर होत असून सोन्याचा भाव गगनाला भिडला आहे. दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे.
कोणत्या शहरात सोन्याला किती दर?
इंडियन बुलियननुसार, आज 18 एप्रिल (शुक्रवारी) सकाळी 10 वाजता सोन्याचा भाव 95410 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने विकला जात होता. मुंबईत 10 ग्रॅम सोने 95,240 रुपये दराने विकले जात आहे. तर चांदी 95,240 रुपये प्रति किलो आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 95,520 रुपये आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव 95,080 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. कोलकातामध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,110 रुपये आहे. हे हैदराबादमध्ये 95,390 रुपये आणि बंगळुरूमध्ये 95,310 रुपयांना विकले जात आहे. मजबूत जागतिक मागणीमुळे राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 70 रुपयांनी वाढून 98,170 रुपये प्रति 10 ग्रॅम या नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत
99.5 टक्के शुद्धतेचे सोनेही 70 रुपयांनी वधारून 97720 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. कमकुवत डॉलर, वाढत्या व्यापार युद्धातील तणाव आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर जागतिक आर्थिक वाढीवरील वाढत्या चिंतेमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. जागतिक अनिश्चितता कायम राहिल्याने सोन्याच्या किंमती वाढत गेल्या आहेत. अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि महागाई आणि मंदीची भीती निर्माण झाली. बाजार या जोखमींना तोंड देत असताना, अस्थिरता टिकून राहते.
दरम्यान, चीन-अमेरिकेतील व्यापारविषयक मतभेद आणि टॅरिफ युद्ध यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढतो आहे. काही काळ दर नरमावले असले तरी नव्याने उफाळलेल्या संघर्षामुळे पुन्हा सोन्याची किंमत उसळू लागली आहे. व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारतासह जगभरातील वायदे बाजारात सोन्याला मागणी वाढली आहे. अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याच्या बाजारात मोठी लगबग असते. त्यातच अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध चांगलेच भडकले थेट परिणाम सोन्यासह चांदीच्या दरावर दिसून आला. सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:























