अदानी ग्रुपनं केली चार नवीन कंपन्यांची एकत्र स्थापना, गौतम अदानींचा मोठा प्लॅन
भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. गौतम अदानी यांनी आणखी मोठं पाऊल उचलले आहे.
Gautam Adani : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani) आपला व्यवसाय सतत वाढवत आहेत. गौतम अदानी यांनी आणखी मोठं पाऊल उचलले आहे. अदानी यांनी चार नवीन कंपन्या (अदानी 4 नवीन फर्म्स) तयार केल्या आहेत. अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग नाइनने काल (18 डिसेंबर) रोजी पूर्ण मालकीच्या चार उपकंपन्या स्थापन केल्या आहेत.जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती.
या चार कंपन्या अदानी ग्रुपमध्ये सामील
पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी ग्रुप कंपनी, अदानी ग्रीन एनर्जीने चार स्टेप डाउन उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. यामध्ये अदानी रिन्युएबल एनर्जी सिक्स्टी, अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टीटू, अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टी थ्री आणि अदानी रिन्यूएबल एनर्जी सिक्स्टी फोर यांचा समावेश आहे.
कंपन्यांची नोंदणी अहमदाबादमध्ये
अदानी ग्रुपच्या या चारही युनिट्सचे अधिकृत आणि पेड-अप भागभांडवल प्रत्येकी एक लाख रुपये आहे. अदानी ग्रीन एनर्जीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत या नवीन कंपन्यांची माहिती दिली आहे. अदानी रिन्यूएबल एनर्जी होल्डिंग नाइनने 18 डिसेंबर रोजी पूर्ण मालकीच्या चार उपकंपन्या स्थापन केल्या आहेत, असं म्हटलं आहे. त्यांची नोंदणी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाली आहे.
विलीनीकरण आणि नवीन कंपन्यांच्या स्थापनेची घोषणा
चार कंपन्यांची स्थापना करण्यापूर्वी अदानी ग्रीन एनर्जीने अदानी रिन्यूएबल एनर्जी 51 लिमिटेड आणि अदानी रिन्यूएबल एनर्जी 55 लिमिटेड या दोन उपकंपन्यांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. अदानी ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, नवीन युनिट्स तयार करण्याचे उद्दिष्ट म्हणजे सौर किंवा इतर अक्षय ऊर्जा स्त्रोतांपासून कोणत्याही प्रकारच्या उर्जेचे उत्पादन, विकास, रूपांतर, वितरण, प्रसारण, विक्री आणि पुरवठा करणे आहे.
महत्त्वाच्या बातम्या: