एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

डील पक्की... गौतम अदानींनी विकत घेतली सिमेंट क्षेत्रातील 'ही' मोठी कंपनी; कितीचा झाला सौदा?

Ambuja Cement च्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंबुजा सिमेंटकडून सांघी इंडस्ट्रीजचे अधिग्रहण केलं आहे. हा करार 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर झाला आहे.

Gautam Adani Firm Announces Acquisition of Sanghi Industries: अदानी समुहाच्या (Adani Group) पोर्टफोलिओमध्ये आता नव्या कंपनीचा समावेश झाला आहे. सिमेंट क्षेत्रात आपला दबदबा वाढवत गौतम अदानी (Gautam Adani)  यांची मालकी असलेल्या अंबुजा सिमेंट (Ambuja Cement) कंपनीच्या वतीनं संघी सिमेंटचं अधिग्रहण केल्याचं जाहीर केलं आहे. या करारांतर्गत अंबुजा सिमेंट संघी इंडस्ट्रीजच्या (Sanghi Industries) प्रोमोटर्सकडून 56.74 टक्के स्टेक घेणार आहे.

शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घोषणा

आठवड्यातील व्यवहाराच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजार (Share Market) सुरू होण्यापूर्वीच गौतम अदानी यांच्या कंपनीनं हा करार झाल्याचं जाहीर केलं. कंपनीनं सांघी इंडस्ट्रीजचं अधिग्रहण केल्याचं सांगितलं. बिझनेस टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अंबुजा सिमेंटनं केलेला हा सौदा 5000 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ व्हॅल्यूमध्ये झाला आहे. अंबुजा सिमेंट सध्याच्या प्रमोटर समूह रवी सांघी अँड फॅमिलीकडून संघी इंडस्ट्रीजमधील बहुसंख्य स्टेक घेणार आहे. कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, हे अधिग्रहण संपूर्णपणे अंतर्गत स्रोतांमधून केलं जाईल.

संघी सिमेंटच्या अधिग्रहणाबाबत गौतम अदानी काय म्हणाले?

अंबुजा सिमेंट आणि संघी इंडस्ट्रीज यांच्यातील या कराराबाबत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले की, या करारामुळे अंबुजा सिमेंटची प्रतिमा बाजारपेठेत उंचावणार आहे. या अधिग्रहणामुळे आम्ही 2028 पर्यंत आमची सिमेंट क्षमता दुप्पट करू. अदानी यांच्या मते, कंपनी सिमेंट उत्पादनात 140 एमटीपीए लक्ष्य गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. संघी इंडस्ट्रीजकडे अब्जावधी टन चुनखडीचा साठा आहे आणि अंबुजा सिमेंट संघीपुरम येथील सिमेंट क्षमता पुढील 2 वर्षांत 15 एमटीपीएपर्यंत वाढवेल.

कराराची घोषणा होताच शेअर्समध्ये तेजी 

अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील प्रमुख कंपनी अंबुजा सिमेंटच्या या व्यवहाराचा परिणाम कंपनीच्या शेअरवरही दिसून येत आहे. अंबुजा सिमेंटचा स्टॉक तेजीत आहे. शेअर बाजारात (Stock Market) घसरण होऊनही अंबुजा सिमेंटचा शेअर मात्र हिरव्या चिन्हावर व्यवहार करत आहे. या कराराच्या घोषणेनंतर लगेचच अंबुजा सिमेंटचे शेअर्स गुरुवारी जवळपास एक टक्क्यांनी वाढून 466.6 रुपयांवर पोहोचले. ही बातमी लिहीपर्यंत अंबुजाचा शेअर 464 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात असलेले संघी इंटीग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग यूनिट क्षमतेच्या दृष्टीनं देशातील सर्वात मोठं सिमेंट आणि क्लिंकर युनिट आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

India: 'हे' आहेत देशातील टॉप-10 श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या व्यवसाय आणि वार्षिक उत्पन्न...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget