एक्स्प्लोर

Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठी जप्ती; शाओमी कंपनीचा 5,571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार

Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठ्या जप्तीला ईडीला मंजुरी मिळाली आहे. या जप्तीत शाओमी कंपनीचा 5,571 कोटी रुपयांचा निधी ईडी गोठवणार आहे.

Xiaomi Fund : देशातील सर्वात मोठ्या जप्तीच्या कारवाईची परवानगी सक्तवसुली संचलनालयाला म्हणजेच, ईडीला (ED) मिळालेली आहे. चीनची मोबाईल उत्पादन करणारी कंपनी शाओमीचा (Xiaomi) 5 हजार 551 कोटींचा निधी आता ईडीकडून गोठवण्यात येणार आहे. परकीय चलन विनिमय कायद्याचे (FEMA) उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयानं कंपनीविरुद्ध तपास केला होता. यानंतर कंपनीचा 5 हजार 551 कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडीची देशातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी जप्तीची कारवाई आहे. बनावट कागदपत्र तयार करून रॉयल्टीच्या नावाखाली शाओमीनं ही रक्कम परदेशात पाठवल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

परकीय चलन व्यवस्थापन कायदा (FEMA) चं उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली चीनी मोबाईल निर्माता Xiaomi चे 5,551 कोटी रुपये जप्त करण्याच्या ईडीच्या निर्णयाला फेमा प्राधिकरणानं मान्यता दिली आहे. यापूर्वी, कर्नाटक उच्च न्यायालयानं ED च्या कारवाईविरुद्ध Xiaomi चे अपील फेटाळले होते. Xiaomi भारतात Mi नावानं मोबाईल विकते. फेमा प्राधिकरणाच्या निर्णयाची माहिती देताना ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, तपास यंत्रणेनं योग्य कारवाई केल्याचं स्पष्ट झाल्यामुळे जप्तीची परवानगी देण्यात आली आहे.

रॉयल्टीच्या नावाखाली कोट्यवधींची रक्कम परदेशात पाठवल्याचा आरोप 

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  2014 मध्ये भारतीय मोबाईल मार्केटमध्ये प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच वर्षापासून Xiaomi ने रॉयल्टीच्या नावाखाली कोट्यवधींची रक्कम परदेशात पाठवण्यास सुरुवात केली होती. मुळची चिनी कंपनी असणाऱ्या Xiaomi कंपनीकडून दोन अमेरिकेतील कंपन्यांनाही रॉयल्टी पाठवली जात होती. अमेरिकेतील ज्या कंपन्यांना Xiaomi कडून रॉयल्टी पाठवली जात होती, त्या दोन्ही कंपन्यांचा शाओमीच्या भारतातील कामकाजाशी काहीही संबंध नव्हता. 

...तर कंपनीकडून आकरणार तीन पट अधिक दंड 

हजारो कोटी रुपये परदेशात पाठवणं हे फेमाचे स्पष्ट उल्लंघन असल्याचं ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. कंपनीच्या विरोधात FEMA अंतर्गत कार्यवाही चालू आहे. कंपनीवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास, FEMA उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीला तीनपटींहून अधिक रकमेचा दंड आकारण्यात येणार आहे.  

ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, भारतातील आतापर्यंतच्या जप्तीच्या कारवाईंपैकी ही सर्वाधिक रक्कम आहे, ज्याला प्राधिकरणाची मान्यता मिळाली आहे. 29 एप्रिल रोजी ED नं Xiaomi कंपनीच्या बँकेत जमा केलेली रक्कम FEMA कायद्याअंतर्गत जप्त करण्याचा आदेश जारी केला होता. त्यानंतर तो प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. FEMA अंतर्गत भारतातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी जप्ती असल्याचं सांगितलं जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Highest Dividend : कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
कर्जमुक्त मल्टीबॅगर स्टॉकडून प्रति शेअर 40 रुपयांचा लाभांश जाहीर, शेअरमध्ये जोरदार तेजी सुरु
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मोठी घोषणा! 10 आणि 20 रुपयांच्या नोटा बदलल्या जाणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Sonam Wangchuk Hunger Strike: दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतर-मंतरवरून का हटवले? अखेर समोर आलं मोठं कारण
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे, राम रक्षा कवच त्यांच्या कामाचं नाही, श्राप...'
Nashik Crime News: नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
नाशकात PG मध्ये राहणाऱ्या तरुणीला भररस्त्यात संपवलं; कायद्याच्या बालेकिल्ल्यात धक्कादायक घटना!
Maharashtra Weather Update : राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
राज्यातील पावसाबाबत मोठी अपडेट; चार दिवस कोकणसह घाटमाथ्यावर मुसळधार, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाता अंदाज
Abhijeet Dipke : सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
सोनम वांगचूक यांना 'जंतर मंतर'वरुन दिल्ली पोलिसांनी हटवलं, अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आंदोलकांना मारहाण अन् बळजबरीने..."
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra Breaking LIVE: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी
Manoj Jarange Patil: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
Embed widget