एक्स्प्लोर

खेड्यातल्या लोकांचा खर्च वाढला! ग्रामीण लोक करतायेत शहरी लोकांशी स्पर्धा, नेमका किती आहे मासिक खर्च?

ग्रामीण भागातील लोक देखील शहरी भागातील लोकांच्या पटीत खर्च करताना दिसत आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक किती पैसे खर्च करतात याबाबतची माहिती पाहुयात.

Rural areas expenses : अलिकडच्या काळात ग्रामीण भागातील लोक देखील मोठ्या प्रमाणात खर्च करताना दिसत आहेत. शहरी भागातील लोकांचा मोठा खर्च होतो असं बोललं जातं, हे खरं आहे. मात्र, ग्रामीण भागातील लोक देखील शहरी भागातील लोकांच्या पटीत खर्च करताना दिसत आहेत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लोक किती पैसे खर्च करतात याबाबतची माहिती पाहुयात.

आत्तापर्यंत इतर गोष्टींवर खेड्यापाड्याच्या तुलनेत शहरात जास्त खर्च होत असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळं लोक गावापेक्षा शहरात जास्त खर्च करतात. तुम्हीही आत्तापर्यंत असाच विचार करत असाल तर ‘हाउसहोल्ड कंजप्शन एक्सपेंडिचर -2023-24’च्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे.  या अहवालात गाव आणि शहर यामधील सरासरी मासिक खर्चातील तफावत कमी झाल्याचे समोर आले आहे. शहरी भागात ज्या प्रमाणे लोक खर्च करतात, अलिकडे त्याच प्रमाणात गावाकडील लोक देखील खर्च करताना दिसत आहेत. 

ग्रामीण स्तरावर दरडोई मासिक उपभोग खर्च 2023-24 मध्ये 4122 रुपये

ग्रामीण स्तरावर दरडोई मासिक उपभोग खर्च 2023-24 मध्ये 4,122 रुपये झाला आहे. जो 2022-23 मध्ये 3,773 रुपयांवरून 9.3 टक्क्यांनी वाढला आहे. 2011-12 मध्ये तो 1,430 रुपये होता. एका वर्षाच्या कालावधीत ग्रामीण खर्चातील ही वाढ 6,996 रुपयांच्या दरडोई शहरी सरासरी मासिक खर्चापेक्षा जास्त होती. जी 2022-23 मधील 6,459 रुपयांपेक्षा 8.3 टक्के जास्त आहे. 2011-12 मध्ये शहरी सरासरी मासिक दरडोई उपभोग खर्च (MPCE) 2,630 रुपये प्रति व्यक्ती होता.

गावकरीही खर्चात आघाडीवर

ग्रामीण आणि शहरी कुटुंबांमधील सरासरी मासिक उपभोग खर्चातील फरक 2023-24 मध्ये 69.7 टक्के झाला आहे. जो 11 वर्षांपूर्वी 2022-23 मध्ये 71.2 टक्के आणि 2011-12 मध्ये 83.9 टक्के होता. यावरुन असे दिसते की शहरी लोकसंख्येच्या तुलनेत ग्रामीण भारतात खर्चाचा वेग वाढला आहे, ज्यामुळे त्याचा वापर कमी होताना दिसत आहे.

भारतीयांचा खर्च वाढला 

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार,  ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील व्यक्तीच्या अन्नावरील खर्चाचा वाटा 2023-24 मध्ये वाढला  आहे. सरासरी मासिक दरडोई खर्च (MPCE) किंवा अन्नावरील व्यक्तीचा सरासरी खर्च 2022-23 मध्ये 46.38 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये वाढून 47.04 टक्के झाला आहे. शहरी कुटुंबांचा अन्नावरील खर्च गेल्या वर्षीच्या 39.17 टक्क्यांवरून 2023-24 मध्ये 39.68 टक्के झाला आहे. गावाकडील लोक अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करताना दिसत आहेत. शहरी लोकांच्या बरोबर पैसा खर्च होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या:

ना भाडे, ना कर्जाची EMI, तुमच्या खिशातले सर्वाधिक पैसे जातात कुठे? सविस्तर माहिती एका क्लिकवर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Maharashtra Politics | संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांचं मौन का? ABP MajhaZero Hour Dr Ravi Godse : HMPV व्हायरसमुळे घाबरु नका! अफवांवर विश्वास ठेऊन घाबरु नकाZero Hour : मेट्रोची कामं, अवजड वाहनं डोकेदुखी ठरतात? ठाणे महापालिकेचे मुद्दे काय?Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
नवी मुंबई, नागपूर आणि शिर्डी विमानतळांची कामे गतीने मुदतीत पूर्ण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये
Embed widget