PF धारकांसाठी महत्त्वाचं! 30 नोव्हेंबरपर्यंत 'हे' काम करा, अन्यथा होऊ शकतं आर्थिक नुकसान
EPFO Work : PF धारकांसाठी महत्त्वाचं! 30 नोव्हेंबरपर्यंत जर UAN नंबर आधारशी लिंक केलं नाही. तर आर्थिक नुकसान होऊ शकतं.
EPFO Work : एम्प्लॉई प्रॉविडंट फंड ऑर्गनायजेशनने (EPFO)अनेकदा सांगितलं आहे की, जर पीएफ (Provident Fund) सब्स्क्रायबर्सनी 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्या UAN ला आधारशी लिंक केलं नाही, तर त्यांचं खातं बंद होईल. यामध्ये पीएफचे पैसे जमा होऊ शकणार नाही आणि पगारदार वर्गातील कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकणार नाहीत.
ईपीएफओने या संबंधित समस्या सोडवण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्याद्वारे तुम्ही तुमची समस्या सोडवू शकता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही तुम्हाला वारंवार आठवण करून देत आहोत की, ज्या लोकांनी त्यांचा UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आधार (AADHAAR) शी लिंक केलेला नाही, त्यांनी ते त्वरित करावा अन्यथा 30 नोव्हेंबर 2021 च्या रात्रीनंतर हे काम शक्य होणार नाही.
जर पगारदार वर्गाला त्यांच्या कंपनीकडून हे काम करण्याची वारंवार आठवण करून दिली जाते. परंतु, तरीही काही संस्था किंवा संस्थेतील कर्मचारी UAN आधारशी लिंक करणं टाळतात, अशातच आता त्यांच्याकडे 29 आणि 30 नोव्हेंबरचे दिवस शिल्लक असून त्यांनी हे काम तातडीने करावं, असंही EPFO अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
कंपनीकडून मिळालेली विम्याची रक्कमही जमा केली जाणार नाही
पीएफ खात्यावर कर्मचाऱ्यांना इंशोरन्स कव्हर मिळतो. त्यासाठीही UAN आधारला लिंक करणं गरजेचं आहे. एंप्लाई डिपॉजिट लिंक्ड इंश्योरंस अंतर्गत ज्या 7 लाख रुपयांचा विमा कवच कर्मचाऱ्यांना मिळतं. त्याची रक्कमही खात्यात जमा होणार नाही.
PF वर 8.5 टक्के व्याज
काही दिवसांपूर्वीच EPFO नं आर्थिक वर्ष 2020-2021 चं व्याज पीएफ खातेधारकांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट केलं आहे. सरकारनं आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये 8.5 टक्के दरानं व्याज ट्रान्सफर केलं आहे. तुम्ही एसएमएस किंवा मिस्ड कॉलमार्फत बँलेंज चेक करु शकता. EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज दर समान होता. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर मिळत होतं. त्याचप्रमाणे पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं. यानुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, केवायसीमध्ये अडथळा आल्यामुळे, अनेक लोकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.
कोट्यवधी ग्राहकांची PF खाती
EPFO मध्ये सध्या देशातील कोट्यवधी लोकांची खाती आहेत. जवळपास 6 कोटींहून अधिक ग्राहक दर महिन्याला आपल्या पगारातील काही भाग पीएफ (PF) खात्यामध्ये जमा करतात. ज्यामुळे भविष्यात ते पेन्शनचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं.