एक्स्प्लोर

EPFO Interest Rate: खासगी नोकरदारांना बसू शकतो मोठा धक्का, PF व्याजदर घटण्याचे संकेत?

EPFO Interest Rate: खाजगी क्षेत्रात (Pvt Sector) काम करणाऱ्या लोकांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. पीएफवरील व्याजदराबाबत या महिन्यात निर्णय घेतला जाणार आहे.

EPFO Interest Rate: खाजगी क्षेत्रात (Pvt Sector) काम करणाऱ्या लोकांना लवकरच मोठा धक्का बसणार आहे. पीएफवरील व्याजदराबाबत या महिन्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. चालू आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याज आणखी कमी होण्याची शक्यता आहे. पीएफवर आधीच 43 वर्षात सर्वात कमी व्याज मिळत असताना ही निराशाजनक बातमी आता समोर आली आहे.

EPFO Interest Rate: यामुळे पीएफवरील व्याज कमी झाले

सध्या ईपीएफओचे साडेसहा कोटींहून अधिक सदस्य आहेत. तर पीएफवर उपलब्ध व्याज दर अनेक दशकांमधील सर्वात कमी पातळीवर आहे. EPFO ने 2021-22 साठी पीएफचा व्याज दर 8.1 टक्के निश्चित केला होता, जो 1977-78 नंतर पीएफवरचा सर्वात कमी व्याजदर आहे. यापूर्वी 2020-21 मध्ये पीएफवर 8.5 टक्के दराने व्याज मिळत होते. 2020-21 या आर्थिक वर्षात पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2019-20 मध्ये हा व्याजदर 8.65 टक्क्यांवरून 8.5 टक्के करण्यात आला होता.

EPFO Interest Rate: कोट्यवधी लोकांचे होणार नुकसान 

आता 25-26 मार्च रोजी EPFO ​​ची बैठक होणार आहे, ज्यामध्ये व्याजावर निर्णय घेतला जाऊ शकतो. एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पीएफवरील व्याज आणखी 8 टक्क्यांपर्यंत कमी केले जाऊ शकते. बातमीनुसार, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. या कारणास्तव पीएफवरील व्याज जास्त कमी करण्यास वाव नाही, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत हे कमी केलं जाऊ शकतं. असं झाल्यास खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यवधी लोकांचे थेट नुकसान होणार आहे.

EPFO Interest Rate: ईपीएफओ या ठिकाणी करते गुंतवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ​​अनेक ठिकाणी पीएफ खातेदारांच्या खात्यात जमा केलेली रक्कम गुंतवते. या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग व्याजाच्या स्वरूपात खातेदारांना परत केला जातो. सध्या EPFO ​​कर्जाच्या पर्यायांमध्ये 85 टक्के गुंतवणूक करते. ज्यामध्ये सरकारी रोखे आणि बाँडचा समावेश आहे. उर्वरित 15 टक्के रक्कम ईटीएफमध्ये गुंतवली जाते. पीएफचे व्याज कर्ज आणि इक्विटीच्या कमाईच्या आधारावर ठरवले जाते.

पीएफ बॅलन्स कसा तापायला (How to check PF Balance):

  • ईपीएफओच्या वेबसाइटवर जा.
  • 'Our Services' च्या ड्रॉपडाउनमधून 'for employees' वर क्लिक करा.
  • Member passbook वर क्लिक करा.
  • UAN नंबर आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा.
  • पीएफ खाते निवडा आणि ते उघडताच तुम्हाला बॅलन्स दिसेल.
  • SMS द्वारे बॅलन्स तपासण्यासाठी 7738299899 वर 'EPFOHO UAN ENG' मेसेज पाठवा.
  • उमंग अॅपवरूनही पीएफ बॅलन्स तपासता येईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh : पंकजा मुंडेंनी व्हिडीओ कॉल केला, धनंजय मुंडेंनी फोनही केला नाही!Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Saif Ali khan: सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
सैफ अली खान एवढा फीट कसा, जणू शुटींगला निघालाय; संजय निरुपमांचा थेट सवाल, अनेक प्रश्न
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली,  प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
मोठी बातमी! खाजगी बालवाड्या सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याच्या हलचाली, प्ले ग्रूपला लागू होणार सरकारची नियमावली
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
धनंजय मुंडे मोठं मोठं बोलतायत, पण आता तरी राजीनामा द्यावा; वाल्मिकच्या CCTV फुटेजनंतर संभाजीराजे कडाडले
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 14 ठार; तीर्थयात्रेवर निघालेल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू
Anjali Damania: धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
धनंजय मुंडेंचं मंत्रिपद सोडा, आमदारकीच धोक्यात; अंजली दमानियांनी निर्वाणीचं अस्त्रं बाहेर काढलं
Embed widget