EPFO आणि ESIC ग्राहकांसाठी मोठी बातमी, आता ई-वॉलेट सुविधेद्वारे पैसे थेट तुमच्या खात्यात येणार
सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या भागधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. यासंदर्भात सरकार एका नवीन योजनेवर काम करत आहे.
Business News : सरकार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या भागधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. यासंदर्भात सरकार एका नवीन योजनेवर काम करत आहे. त्यामुळं EPFO आणि ESIC ग्राहकांसाठी लवकरच मोठा बदल होऊ शकतो. ई-वॉलेटच्या सुविधेद्वारे, तुमचे पैसे थेट तुमच्या हातात येतील. ज्यामुळे पैसे काढणे सोपे आणि जलद होईल. कामगार मंत्रालय या नवीन योजनेवर काम करत आहे.
ई-वॉलेट योजनेवर काम सुरु
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आणि कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या भागधारकांसाठी सरकार एका नवीन योजनेवर काम करत आहे. लवकरच ग्राहकांना ई-वॉलेटची सुविधा मिळेल, ज्याद्वारे ते त्यांच्या खात्यातील रक्कम थेट वापरू शकतील. कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, या नवीन सुविधेबाबत बँका आणि आरबीआयशी चर्चा सुरू असून, लवकरच योजनेचा मसुदा तयार केला जाईल.
रक्कम थेट ई-वॉलेटमध्ये जमा होणार
सध्या, EPF आणि ESIC दाव्याचे पैसे थेट बँक खात्यात जातात, त्यानंतर भागधारकांना बँक खात्यातून एटीएमद्वारे पैसे काढावे लागतात. नवीन योजनेअंतर्गत, दाव्याची रक्कम थेट ई-वॉलेटमध्ये जाईल, जेणेकरून ग्राहकांना बँकिंग प्रक्रियेमुळे होणारा विलंब आणि त्रास टाळता येईल.
ई-वॉलेट सुविधेचे नेमके काय फायदे?
जलद पैसे काढणे
: तुम्हाला कोणत्याही बँकिंग प्रक्रियेशिवाय थेट ई-वॉलेटमध्ये पैसे मिळतील.
अधिक सुविधा
: डिजिटल पेमेंटची सुविधा वॉलेटद्वारे कुठेही उपलब्ध होईल.
वेळेची बचत
: बँक प्रक्रिया आणि एटीएम रांगांपासून सुटका होईल.
ई-वॉलेट म्हणजे काय?
इलेक्ट्रॉनिक वॉलेट किंवा मोबाइल वॉलेट म्हणून ओळखले जाणारे ई-वॉलेट, घर्षणरहित खरेदी सुलभ करण्याच्या दिशेने खूप पुढे जाते. मोबाइल वॉलेट्स ग्राहकांना प्रत्यक्ष कार्ड वापरण्याऐवजी त्यांचे मोबाइल डिव्हाइस, टॅबलेट किंवा स्मार्ट घड्याळ वापरून संपर्करहीत पमेंट करण्यास सक्षम करण्यासाठी निअर-फील्ड कम्युनिकेशन तंत्रज्ञान वापरतात . डिजिटल वॉलेटच्या विपरीत जेथे पैसे बँक खात्यात राहतात, ई-वॉलेटमध्ये पैसे आधी लोड केले जातात जे नंतर व्यवहारांसाठी वापरले जातात. ई-वॉलेट्स एखाद्या फिजिकल वॉलेटप्रमाणेच काम करतात, ज्यामध्ये केवळ क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड डेटाच नाही तर संभाव्य लॉयल्टी कार्ड डेटा, डिजिटल कूपन, एअरलाइन बोर्डिंग पास आणि अगदी ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती असते. ई-वॉलेट वैयक्तिक पासवर्ड लक्षात ठेवल्याशिवाय ऑनलाइन आणि भौतिक स्टोअरमध्ये सुरक्षित पेमेंट करू शकते. डिजिटल वॉलेट्स केवळ पेमेंट माहिती साठवतात, व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी तुमच्या बँक खात्याशी संवाद साधतात, तर ई-वॉलेट थेट व्यवहारावर प्रक्रिया करतात.
महत्वाच्या बातम्या: