ट्विटर डील अडकली, Elon Musk यांनी केली मोठी घोषणा
Elon Musk on Twitter: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेला ट्विटर करार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी सध्या होल्डवर ठेवला आहे.
Elon Musk on Twitter: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेला ट्विटर करार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या इलॉन मस्क यांनी सध्या होल्डवर ठेवला आहे. असं असलं तरी हा करार कायमचा होल्डवर ठेवला नाही, तर त्यांनी तो तात्पुरता होल्डवर ठेवला आहे. त्यांनी हा करार होल्डवर टाकण्याचे कारण स्पॅम आणि फेक अकॉउंट असल्याचं सांगितलं आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांनी ट्विटरला 44 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार केला होता.
त्यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे की, ट्विटर करार तात्पुरता होल्डवर ठेवण्यात आला आहे. ट्विटरने एका फाइलिंगमध्ये माहिती दिली होती की, त्यांच्या प्लॅटफॉर्मवर फक्त 5% स्पॅम/बनावट खाती आहेत. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 22.9 कोटी वापरकर्ते आहेत.
मस्क यांनी गेल्या आठवड्यातच या करारासाठी 7 अब्ज डॉलर्स सुरक्षित केले आहेत, जेणेकरून ते 44 अब्ज डॉलर्सचा हा करार पूर्ण करू शकतील. डील झाल्यापासून इलॉन मस्क हे ट्विटर प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेली बनावट खाती काढून टाकण्याबद्दल बोलत आहे. ते कराराच्या वेळी म्हणाले होते की, जर हा करार झाला तर त्याचे प्राधान्य प्लॅटफॉर्मवरून बनावट खाती काढून टाकण्यावर असेल.
Twitter deal temporarily on hold pending details supporting calculation that spam/fake accounts do indeed represent less than 5% of usershttps://t.co/Y2t0QMuuyn
— Elon Musk (@elonmusk) May 13, 2022
प्री-मार्केटमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत घसरली
ट्विटर करार होल्डवर ठेवल्याची माहिती समोर येताच ट्विटरच्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाल्याची पाहायला मिळाली आहे. प्री-मार्केट ट्रेडिंगमध्येच कंपनीचे शेअर्स जवळपास 20% घसरले. काही दिवसांपूर्वीच एका फर्मने ट्विटर आणि मस्क यांच्यातील डीलबाबत असा अंदाज व्यक्त केला होता. शॉर्ट सेलर Hindenburg Research ने आपल्या अहवालात सांगितले होते की, जर इलॉन मस्क या डीलमधून मागे हटले तर ट्विटरच्या नवीन डीलची किंमत कमी केली होईल. मात्र हा करार रद्द झाल्यास मस्क यांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.