एक्स्प्लोर

मोठी बातमी! आता लवकरच लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार, 'या' तारखेला बँक खात्यात पैसे येण्याची शक्यता

राज्यातील महिलांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकार आता याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) चर्चा चालू आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची मदत केली जात आहे. आतापर्यंत एकूण दोन टप्प्यांत पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे. दरम्यान, आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार? याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहात आहेत. असे असतानाच आता राज्य सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. येत्या 29 सप्टेंबर रोजी महिलाना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.

29 सप्टेंबर रोजी लाडक्या बहिणींना पैसे मिळणार?

मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत येत्या 29 सप्टेंबर रोजी या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वााटपावर शिक्कामोर्तब होऊ शकते. येत्या 29 सप्टेंबर रोजी तिसऱ्या हप्त्याचे वाटप करण्याचे ठरलेच तर या हप्त्याच्या वाटपासाठी रायगड येथे कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकते. त्यावरही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे. 

30 सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज

राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवलेली आहे. अगोदर ही मुदत 31 ऑगस्टपर्यंत होती. आता मात्र सरकारने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यास मुभा दिलेली आहे. राज्यातील महिला या योजनेपासून वंचित राहू नयेत. तसेच जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आधार बँक खात्याला लिंक असणे गरजेचे

दरम्यान, आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे दोन हप्त्यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. मात्र या योजनेसाठी पात्र असूनदेखील अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले नाहीत. बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक नसल्यामुळे महिलांना या योजनेचा अद्याप लाभ मिळू शकलेला नाही. याच कारणामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून घ्यावे, असे आवाहन केले जात आहे. 

हेही वाचा :

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार! प्रशासन अॅक्टीव्ह मोडवर, गैरप्रकाराचे ३० गुन्हे दाखल

Ladki Bahin Yojana : फोटो अन् आधार कार्ड महिलांचं, अर्जावर नाव पुरुषांचं, लाडकी बहीण योजनेत घुसखोरी करणाऱ्या भावांचा भांडाफोड

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले? राज्य सरकारनं जारी केली आकडेवारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाहीमध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्तनालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर संतापले, उद्धव ठाकरेंनी भर सभेत सतेज पाटलांना आपुलकीने जवळ घेतलं, कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष, नेमकं काय घडलं?
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनतील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनतील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Embed widget