Stock Market Update : एका दिवसात शेअर 9000 रुपयांनी वाढला, कंपनीची मोठी घोषणा, गुंतवणूकदारांची लागली रांग
Elcid Investment Share : एल्सिड इन्वेस्टमेंटचा शेअर गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. हा शेअर 29 ऑक्टोबरला चर्चेत आला होता.
Elcid Investment Share मुंबई :एल्सिड इन्वेस्टमेंटचा शेअर गेल्या महिन्याभरापासून चर्चेत आहे. या कंपनीचा शेअर 29 ऑक्टोबरला 66,92,535 टक्के वाढला होता आणि गुंतवणूकदारांना आश्चर्यजनक रिटर्न मिळाले होते. तेव्हापासून एल्सिड इन्वेस्टमेंटच्या शेअरमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या कंपनीचा शेअर 3 लाख रुपयांवर पोहोचला होता. 16 डिसेंबरला या कंपनीच्या शेअरमध्ये 9376 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. यामुळं गुंतवणूकदारांनी शेअर खरेदीला प्राधान्य दिलं. आज एल्सिड इन्वेस्टमेंट च्या शेअरला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.
एल्सिड इन्वेस्टमेंट कंपनीचा शेअर सोमवारी 196911.40 रुपयांपर्यंत पोहोचला. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा या कंपनीचा शेअर 187534.70 रुपयांवर होता. या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्यामध्ये देखील एक कारण आहे. कंपनीनं आता टाइप -1 एनबीएफसी म्हणून नोंदणीचा प्रस्ताव एनएसई अन् बीएसईला दिला आहे तर आरबीआयकडे अर्ज देखील करण्यात आला आहे.
कंपनीनं शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार म्हटलं की 13 डिसेंबर 2024 ला कंपनीनं टाइप-1 एनबीएफसी-एनडीच्या रुपात नोंदणीसाठी आरबीआयकडे अर्ज केला आहे. एल्सिड इन्वेस्टमेंटची मार्केट कॅप 4000 कोटी रुपायंपेक्षा कमी आहे. 332,399.95 रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर तो 2 लाख रुपयांपर्यंत खाली घसरला होता. गेल्या महिन्यात एल्सिडच्या शेअरमध्ये 28 टक्के घसरण झाली आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरचा सीएजीआर 658 टक्के आहे. एल्सिड इन्वेस्टमेंटचा पी/ई नोव्हेंबरमधील 30 पटींवरुन घसरुन 15.5 पटींवर आला आहे.
एल्सिड इन्वेस्टमेंटचा सप्टेंबर महिन्यात संपलेल्या तिमाहीचा महसूल 3.57 कोटी रुपये होता. जो QoQ पेक्षा कमी आहे. कंपनीचा निव्वळ नफा 2.80 कोटी रुपये होता. या कंपनीच्या प्रमोटर कंपनीत एशियन पेंटसचा देखील समावेश आहे. त्यांच्याकडे एकूण 2.95 टक्के भागिदारी आहे.
एल्सिड इन्वेस्टमेंट अगोदर भारतीय शेअर बाजारात सर्वाधिक किंमतीचा शेअर म्हणून एमआरएफच्या शेअरकडे पाहिलं जात होतं. एल्सिड इन्वेस्टमेंटचा जुलै 2024 मध्ये शेअर 3 रुपयांच्या दरम्यान होता.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)