एक्स्प्लोर

IPO Update : पैसे तयार ठेवा, या आठवड्यात  9 आयपीओ येणार, 3500 कोटींची उभारणी, कमाईची मोठी संधी 

IPO Update : शेअर बाजारात या आठवड्यात 9 कंपन्यांचे आयपीओ खुले होणार आहेत. त्यातून 3500 कोटी रुपयांची उभारणी केली जाणार आहे.

IPO Update मुंबई : 2024 या वर्षाचा आता शेवटचा महिना सुरु आहे. यंदा आयपीओतील गुंतवणुकीतून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचं पाहायला मिळालं. वारी एनर्जीज, प्रिमियम एनर्जीज, पीएनजी ज्वेलर्स या सारख्या अनेक आयपीओनं गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. एसएमई क्षेत्रातील आयपीओतील गुंतवणूक देखील फायदेशीर ठरली. आता या आठवड्यात 9 आयपीओ गुंतवणूकीसाठी खुले होणार आहेत. तर, काही आयपीओचं लिस्टींग देखील या आठवड्यात होणार असल्यानं शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील. 

या आठवड्यात 9 कंपन्यांचे आयपीओ सबस्क्रिप्शन साठी खुले होतील. याशिवाय मोबिक्विक, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेस या कंपनीचे आयपीओ उद्या लिस्ट होणार आहेत. 

गुजरातची कंपनी ममता मशिनरीनं  179 कोटी रुपयांच्या उभारणीसाठी आयपीओ आणला आहे. या आयपीओचा किंमतपट्टा 230 ते 243 रुपये निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ 19 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुला होईल आणि 23 डिसेंबरपर्यंत बोली लावता येईल. 

ट्रान्सरेल लाइटिंग कंपनीचा आयपीओ देखील 19 डिसेंबरला खुला करण्यासाठी तयारी करत आहे. 

DAM कॅपिटल अडवायजर्सचा आयपीओ देखील 19 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. सनातन टेक्स्टाइल देखील 19 डिसेंबरला सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल तर 23 डिसेंबरपर्यंत बोली लावता येईल. या आयपीओचा किंमतपट्टा 305 ते 321 रुपये असेल. 

वेंटिव हॉस्पिटलिटीनं देखील त्यांचा आयपीओ 20 डिसेंबरला लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. यात बोली लावण्याची मुदत 24 डिसेंबरला आहे. 

कॉनकॉर्ड एनवायरो सिस्टीम्सचा आयपीओ देखील 19 डिसेंबरला खुला होईल.या आयपीओचा किंमतपट्टा प्रति शेअर 665-701 रुपयांदरम्यान असेल. 

एसएमई क्षेत्रात देखील तीन आयपीओ येणार आहेत. यामध्ये NACDAC इन्फ्रास्ट्रक्चर, न्यू मलयालम स्टील आणि आयडेंटिकल ब्रेन्स स्टुडिओजचे आयपीओ 17 डिसेंबर आणि 18 डिसेंबरला गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. 

तीन आयपीओ उद्या लिस्ट होणार 

आयपीओत गुंतवणूक केल्यानं चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं गेल्या अनेक आयपीओच्या लिस्टींगनंतरच्या आकडेवारीनुसार पाहायला मिळतं. गेल्या काही दिवसांमध्ये आयपीओ  सबस्क्राइब करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. आता उद्या तीन कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात लिस्ट होत आहेत. यामध्ये मोबिक्विक या फिनटेक कंपनीचा तर विशाल मेगा मार्ट या सुपर मार्केट साखळी चालवणाऱ्या कंपनीचा आयपीओ लिस्ट होणार आहे. याशिवाय साई लाइफ सायन्सेस या कंपनीचा आयपीओ देखील लिस्ट होत आहे. 

इतर बातम्या : 

भारतातील टॉप उद्योगपती मुकेश अंबानी-गौतम अदानी 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमधून बाहेर, जाणून घ्या संपत्ती नेमकी किती? 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?
छगन भुजबळांसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का वगळलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 डिसेंबर 2024 : ABP MajhaChhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्राMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  17 डिसेंबर 2024 : ABP MajhaJawaharlal Nehru Letters Special Report:पंडित नेहरुंची पत्रं,वादाचं नवं कोरं सत्र! प्रकरण नेमकं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरमध्ये शर्ट अडकून आत खेचला गेला, तरुण कोबीसारखा चिरला गेला; वरळीतील भयावह प्रकार
Cold Wave Maharashtra: उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
उत्तरेत शुन्याखाली गेलं तापमान,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ-मराठवाड्यात 'या' तारखेपर्यंत थंडीची लाट 
Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Chhagan Bhujbal: अजित पवारांनी ताकदवान छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून का वगळलं?
छगन भुजबळांसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याला अजित पवारांनी मंत्रिमंडळातून का वगळलं?
Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर येवल्यामध्ये बंडाचं निशाण फडकणार का? भुजबळांची पुढची वाटचाल कशी? 
Georgia : जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
जॉर्जियातील रिसॉर्टमध्ये 11 भारतीयांचा मृत्यू, बेडरुममध्ये मिळाले सर्वांचे मृतदेह; मृत्यूचं मोठं कारण समोर
Surya Gochar 2024 : आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
आजपासून 3 राशींचे 'अच्छे दिन' सुरू; जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह वेळोवेळी धनलाभाचे योग
FSSAI : एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
एक्सपायरी डेट 45 दिवसांपेक्षा कमी असेल तर खाद्यपदार्थांची डिलिव्हरी नको, FSSAI ची ऑनलाईन फूड कंपन्यांना सूचना
Embed widget