एक्स्प्लोर

Gold Price Today: सोनं आणखी महागणार, अक्षय्य तृतीयेला सोनं 1 लाखांवर जाणार? तज्ज्ञांचं मत काय? 

Gold Price Today: आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततांमुळं 30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेवेळी सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर पोहोचलेले असू शकतात, असा अंदाज आहे.  

Gold Price Today नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात टॅरिफ वॉरवरुन अमेरिका आणि चीनमध्ये वार पलटवार सुरु आहेत. टॅरिफ वॉरच्या काळात सोन्याच्या दरात वाढ होत आहे. साडेतीन महिन्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 93350 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह 10 ग्रॅम सोन्याचे दर 96000 रुपयांवर पोहोचले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर गोल्ड फ्यूचर्सचे उच्चांकी दर 93340 रुपयांवर होते. अमेरिका आणि चीन यांच्यातील आर्थिक वादाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी वाढ होतेय. कारण, गुंतवणकूदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यातील गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.  

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 91110 रुपये इतकी आहे. 20 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर  83080 रुपये इतके आहेत. 18 कॅरेट सोन्याचेदर 75620 रुपये तर 14 कॅरेट सोन्याचे दर 60210 रुपयांवर आहेत. 2025 मध्ये साडेतीन महिन्यात सोन्याच्या दरात साधारणपणे 20 टक्क्यांची वाढ झाली असून एक तोळा सोन्याचे दर 16 हजार रुपयांनी वाढले आहेत.  

सोनं एक लाखांचा टप्पा पार करणार?

सोने खरेदी विक्री क्षेत्रातील जाणकारांच्या अंदाजानुसार 30 एप्रिलला अक्षय्य तृतीयेला सोन्याचे दर 1 लाख रुपयांवर जाऊ शकतात. एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सीचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी यांच्या हवाल्यानं इकोनॉमिक्स टाइम्सनं सोन्याचा सपोर्ट लेव्हल 92000 नुसार सध्या दर 94500 ते 95000 दरम्यान आहे. मात्र, त्यांनी स्पष्टपणे सोन्याचे दर 1 लाखांच्या पार जातील की नाही हे सांगितलं नाही. 

देशांतर्गत  आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजापेक्षा जास्त सोन्याची खरेदी होत आहे. कॉमेक्सवर सोन्याचे दर 3240 ते 3260 डॉलर प्रति औंस दरम्यान आहेत. तर भारतात 10 ग्रॅम सोन्याचे दर 92000 ते 94000 रुपयांदरम्यान आहेत.  

बाजारातील अस्थिरतेमुळं सोन्याचे दर वाढले

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी हेड आणि विश्लेषक अनुज गुप्ता यांच्या हवाल्यानं इकोनॉमिक्स टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत सोन्याचे दर 1 लाखांचा टप्पा पार करतील, असं म्हणणं अतिघाईचं ठरेल.

गुंतवणूकदार फायद्यात पण ग्राहकांची अडचण

भारतात सोन्याच्या दागिन्यांना अधिक महत्त्व दिलं जातं. विविध सणांच्या काळात सोने खरेदीला प्राधान्य दिलं जातं. लग्नसराईमुळं देखील सोन्याची मागणी वाढलेली असते. या कालावधीत सोन्याचे दर वाढले आहेत. 2025 मधील साडेतीन महिन्यात सोन्याचे दर 16 हजारांनी वाढल्यानं गुंतवणूकदारांचा फायदा झालाय. तर, सोने खरेदी करणाऱ्यांची मात्र यामुळं अडचण होत असल्यानं त्याचा परिणाम सोने विक्रेत्यांच्या उलाढालीवर झाला आहे.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget