एक्स्प्लोर

मतदान करा, सवलत मिळवा! मतदारासांठी फ्लाइट ते जेवणापर्यंत खास सूट, सविस्तर माहिती एका क्लिकवर 

देशात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मतदारांना (Voter) आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक कंपन्या मतदान करणाऱ्यांना विशेष सवलत देत आहेत.

Discount For Voters: देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 80 जागांवर आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. देशात जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी मतदारांना (Voter) आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. अनेक कंपन्या मतदान करणाऱ्यांना विशेष सवलत देत आहेत. जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.

देशातील 80 लोकसभा मतदारसंघात आज मतदान 

आज देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 80 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सात मतदारसंघाचा समावेश आहे.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. आता देशातील जनता कोणाा कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यासाठी मात्र, सर्वांनाचं 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. कारण 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीत जास्तीत जास्त मतजान व्हावं यासाठी निवडणूक आयोगासह विविध संस्था मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत. विविध कंपन्या ऑफर्स देखील देत आहेत. 

विमान प्रवासासाठी 19 टक्क्यांची सूट

मतदारांनी मतदान करावं यासाठी विविध कंपन्या आपल्या सेवांमध्ये सूट देत आहेत. फ्लाइटपासून ते जेवणापर्यंत खास ऑफर सुरु आहेत. एव्हिएशन कंपनी एअर इंडिया एक्सप्रेस 18 ते 22 वर्षे वयोगटातील मतदारांना प्रथमच मतदान करण्यासाठी भाड्यात विशेष सवलत देत आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच मतदान करत असाल आणि तुम्हाला जर मतदानासाठी जायचे असेल तर फ्लाइटच्या भाड्यात  19 टक्के विशेष सवलत देण्यात येत आहे. ही सवलत देशांतर्गत उड्डाणांसह आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवरही देण्यात आली आहे. 

मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी वाहनांची सेवा

दरम्यान, मतदारांना आकर्षित करण्यासाठी BlueSmart या इलेक्ट्रिक वाहन राइड हॅलिंग सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने आपल्या भाड्यात सवलत देण्याचा निर्णय घेतलाय. ही कंपनी दिल्ली आणि बंगळुरुमध्ये मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी आणि परत आणण्यासाठी भाड्यात सवलत देत आहे. Enrich हे आपल्या सलून चेनमधील मतदारांना 50 टक्के अतिरिक्त सवलत किंवा रिवॉर्ड पॉइंट देत आहे. ही सेवा अहमदाबाद, बंगळुरु, मुंबई, इंदूर, पुणे या शहरांसाठी आहे.  तर अनेक ठिकाणच्या हॉटेलमध्ये मतदान केलेल्यांना खास सूट देण्यात येत आहे. विविध कॅफेमध्येही ऑफर्स देण्यात येत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Lok Sabha Election 2024 :अमरावतीच्या मेळघाटातीळ सहा गावांचा आक्रमक पवित्रा; थेट मतदानावर टाकला बहिष्कार, नेमकं कारण काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special ReportABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 26 January 2024100 Headlines:  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Nashik : प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
प्रजासत्ताक दिनी वनमजुराने डिझेल ओतून स्वतःला पेटवलं; नाशिकमधील धक्कादायक घटना
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
रणजी सामन्यात महाराष्ट्राची बडोदा संघावर मात, 439 धावांनी मोठा विजय; सौरभचे धुव्वादार शतक
Howrah Train Accident : रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
रेल्वे अपघाताची मालिका सुरुच; आता तिरुपती एक्स्प्रेसला रेल्वेची धडक; 3 डबे रुळावरून घसरले
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
मोबाईलच्या स्क्रीनगार्डवरुन वाद; चौघांकडून कामगाराचा खून, पोलिसांनी फिरवली तपासाची च्रके
Embed widget