डिजिटल व्यवहारात भारताचा पहिला नंबर, पण दिल्ली आणि मुंबईच्या अॅपल स्टोरमध्ये काय स्थिती?
सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार (Digital Payments) केले जातायोत. डिजिटल पेमेंटमध्ये भारत (India) पहिल्या क्रमांकावर आहे.
Digital Payments News : सध्याचं युग हे डिजिटल युग आहे. मोठ्या प्रमाणात डिजिटल व्यवहार (Digital Payments) केले जातायोत. डिजिटल पेमेंटमध्ये भारत (India) पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, ॲपल कंपनीला (Apple Comapny) भारतात वेगळ्याच एका समस्येला सामारं जावं लागत आहे. अॅपल ( Apple) कंपनीनं दिल्ली आणि मुंबईत दोन स्टोर ओपन केली आहेत. मात्र, या ठिकाणी जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार होत नसून, रोख व्यवहार होत आहेत. त्या ठिकाणी नोटा मोजण्याचं यंत्र बसवण्याची वेळ आलीय.
भारतातील अॅपल स्टोअरमध्ये रोख पेमेंटचा वाटा जास्त
आयफोन बनवणारी अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी Apple ने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारतात दोन स्टोअर उघडली आहेत. दिल्ली आणि मुंबईत ही दुकाने उघडण्यात आली आहेत. पण या कंपनीला एका विचित्र समस्येचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी ग्राहक मोठ्या संख्येनं ऑनलाइन पेमेंटऐवजी रोख पेमेंट करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळं कंपनीला दोन्ही ठिकाणी नोटा मोजण्याचं यंत्र बसवावे लागले आहे. भारतातील अमेरिकन कंपनीच्या दोन स्टोअरमधील एकूण विक्रीत रोख पेमेंटचा वाटा 7 ते 9 टक्के आहे. अमेरिका किंवा युरोपियन देशांमध्ये, कंपनीच्या स्टोअरमध्ये रोख पेमेंटचा वाटा एका टक्क्यांपेक्षा कमी आहे. अनेक स्टोअरमध्ये रोख पेमेंट शून्य आहे. परंतू, भारतातील ग्राहक अजूनही मोबाईल फोन किंवा संगणक खरेदी करण्यासाठी रोख रक्कम घेऊन दुकानात येत आहेत.
भारतात रोख पेमेंटच्या समस्येचा सामना करणारी ॲपल ही एकमेव कंपनी
ॲपलच्या दिल्लीतील स्टोअरमध्ये रोख रक्कम भरणाऱ्या ग्राहकांची संख्या मुंबईपेक्षा जास्त आहे. भारतातील दोन्ही स्टोअर्सची अमेरिकेतील Apple रिटेल टीमला थेट रिपोर्टिंग लाइन आहे. भारतात रोख पेमेंटच्या समस्येचा सामना करणारी ॲपल ही एकमेव कंपनी नाही. सरकारने 2017 पासून प्रति व्यक्ती 2 लाख रुपये दैनंदिन रोख व्यवहार मर्यादा लागू केली आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणे आणि काळ्या पैशाला आळा घालणे हा त्याचा उद्देश आहे.
वाहने खरेदी करण्यासाठीही रोख रकमेचा वापर
भारतात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली असली तरी रोख चलनातही मोठी वाढ झालीय. मार्च 2017 मध्ये ते 13.35 लाख कोटी रुपयांवरून मार्च 2023 मध्ये 35.15 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे. देशात UPI द्वारे डिजिटल पेमेंटमध्ये भरीव वाढ होऊनही ही परिस्थिती आहे. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं दिेलेल्या माहितीनुसार, मार्च 2017 मध्ये 2,425 कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. तर एप्रिल 2023 मध्ये हे व्यवहार 19.64 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) चा अंदाज आहे की भारतात 15 टक्के ते 20 टक्के कार खरेदी लोक स्वतःच्या पैशाने करतात. लक्झरी वाहने खरेदी करण्यासाठीही लोक 2 लाख रुपयांपर्यंत रोख देतात.
महत्वाच्या बातम्या:
डिजिटल पेमेंट, बँकिंग आणि फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी एकच नंबर, आरबीआयची घोषणा