एक्स्प्लोर

तुमच्याकडे असणारी 500 ची नोट खोटी नाही ना?, RBI ने बनावट नोटांचा लेखाजोखा मांडला

Counterfeit Notes : आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, 10 रुपयांच्या खोट्या नोटांचं प्रमाण  16.4 टक्के आणि 20 रुपयांच्या खोट्या नोटांचं प्रमाणात 16.5 टक्केंनी वाढ झाली आहे.

Counterfeit Notes : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी देशभरात नोटाबंदीचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि दोन हजारांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. देशभरातील बनावट नोटांचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय गेतला होता. पण आरबीआयचा वार्षिक रिपोर्ट पाहिल्यानंतर बनावट नोटांचं प्रमाण वाढलेय. नोटाबंदीच्या सहा वर्षानंतरही बँकिंग सिस्टममध्ये बनावट नोटा आढळत आहेत. त्यामुळे आरबीआयसोबत सरकारचेही टेन्शन वाढलेय. देशात पुन्हा एकदा बनावट नोटांचं संकट वाढलं आहे. सर्वाधिक बनावट नोटा 500 च्या आढळत आहे. गतवर्षी 500 च्या खोट्या नोटा आढळण्याचं प्रमाण तब्बल 100 टक्केंनी वाढलेय. त्यामुळे मार्केटमध्ये असणारी 500 ची नोट खरी आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय. 

खोट्या नोटांचं वाढतं प्रमाण - 
आरसीबीच्या वार्षिक रिपोर्टमध्ये नोटाबंदीनंतर पुन्हा एकदा प्रत्येक वर्षाला खोट्या नोटांचं प्रमाण वाढल्याचं दिसतेय. 2021-22 मध्ये खोट्या नोटांचं प्रमाण 2020-21 च्या तुलनेत 10.7 टक्केंनी वाढलेय. यामध्ये सर्वाधिक 500 च्या खोट्या नोटाचं प्रमाण जास्त आहे. 2020-21 च्या तुलनेत 2021-2022 मध्ये 101.9 टक्केंनी 500 च्या खोट्या नोटा वाढल्या आहेत. तर 2021-2022 मध्ये दोन हजार रुपयांच्या खोट्या नोट्या 2020-21च्या तुलनेत 54.16 टक्केंनी वाढ आहे. 

  • 42 टक्केंनी खोट्या नोटांचं प्रमाण घटलं - 

वर्ष

किती आढळल्या बनावट नोटा?

नोटाबंदीच्या पूर्वीचा कालावधी (2011 to 2016) - Total

27,35,052

2016 (नोटाबंदीचं वर्ष)

7,62,072

नोटाबंदीनंतर (2017 to 2022) 

15,76,458

नोटाबंदीच्या आधीच्या तुलनेत नोटाबंदीनंतर खोट्या नोटांचं प्रमाण

42% टक्केंनी खोट्या नोटांचं प्रमाण घटलं

Source: RBI – Annual Report (2021-22)

नोटाबंदीआधीची खोट्या नोटांची परिस्थिती काय होती? 

November 8, 2016 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली. 

वर्ष

बँकिंग सिस्टिममध्ये आढळलेल्या बनावट नोटा 

2011-12

5,21,155

2012-13

4,98,252

2013-14

4,88,273

2014-15

5,94,446

2015-16

6,32,926

2016-17

7,62,072

Source: RBI – Annual Report (2021-22)

नोटाबंदीनंतर खोट्या नोटा किती आढळल्या?

  • 70 टक्केंनी बनावट नोटा कमी आढळल्या ( 2016-17 to 2021-22)

Year 

बँकिंग सिस्टिममध्ये बनावट नोटांचं प्रमाण  

2017-18

5,22,783

2018-19

3,17,384

2019-20

2,96,695

2020-21

2,08,625

2021-22

2,30,971

Source: RBI – Annual Report (2021-22)

गेल्या तीन वर्षांत 500 च्या बनावट नोटा आढळण्याचं प्रमाण कधी कसं होतं. 

  • गेल्या वर्षी 500 च्या खोट्या नोटा आढळल्याचं प्रमाण तब्बल 102 टक्केंनी वाढलं.  

वर्ष

500 च्या खोट्या नोटा आढळण्याचं प्रमाण

2019-20

30,054

2020-21

39,453

2021-22

79,669

2021-22 मध्ये 500 च्या खोट्या नोटा वाढल्या

तब्बल 102 टक्केंनी खोट्या नोटा वाढल्या

Source: RBI

आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, 10 रुपयांच्या खोट्या नोटांचं प्रमाण  16.4 टक्के आणि 20 रुपयांच्या खोट्या नोटांचं प्रमाणात 16.5 टक्केंनी वाढ झाली आहे. तर 200 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण 11.7 टक्के आणि  50 रुपयांच्या बनावट नोटांचं प्रमाण  28.7 टक्केंनी वाढलेय. इतकेच नाही तर 100 रुपयांच्या खोट्या नोटाचं प्रमाण 16.7 टक्केंनी वाढलेय. आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार,  93.1 टक्के खोट्या नोटा बँकांत मिळाल्या आहेत. तर  6.9 टक्के खोट्या नोटांची ओळख आरबीआयने केली.  

खोट्या नोटांचा परिणाम - 
खोट्या नोटांमुळे देशाच्य आर्थव्यवस्था कमकुवत होते. खोट्या नोटामुळे बँकिंग व्यवस्थेतील रोखीचा प्रवाह वाढल्याने महागाई देखील वाढते. बनावट नोटांमुळे देशात अवैध व्यवहार वाढतातय  कारण अशा व्यवहारांमध्ये कायदेशीर चलन वापरले जात नाही.

खोट्या नोटा आढळल्यास शिक्षा काय?
खोट्या नोटा बाळगणे गुन्हा आहे. तुमच्याकडे खोट्या नोटा आढळल्या तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आयपीसी कलम 489C नुसार तुम्ही गुन्ह्यास पात्र ठरु शकता..तुम्हाला जन्मठेपीची शिक्षाही होऊ शकते. तसेच आर्थिक भुरदंडही भरवा लागू शकतो. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget