Share Market: शेअर बाजारात अस्थिरता कायम, Nifty आणि Sensex आजही घसरला
Stock Market Updates: आयटी, पॉवर आणि सार्वजनिक बँका ही क्षेत्रं सोडली तर इतर सर्वच शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
Share Market Closing Bell: आज सलग दुसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजारात घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) आज 168 अंकांची घसरण झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आज 61 अंकांची घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.28 टक्क्यांची घसरण होऊन तो 60,092 अंकांवर पोहोचला. तर निफ्टीमध्ये आज 0.34 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,894 अंकांवर पोहोचला. आज एकूण 1658 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1844 शेअर्समध्ये घसरण झाली. तर 169 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
Nifty ends below 17900: निफ्टीमध्ये घसरण कायम
गेल्या तीन सत्रांपासून शेअर बाजारात सुरु असलेली चढउतार आजही कायम राहिली. शेअर बाजाराची सुरुवात झाल्यानंतर निफ्टी 18,000 वर पोहोचला आणि नंतर त्यामध्ये घसरण सुरू झाली. गेल्या तीन सत्रापासून निफ्टीमध्ये चांगलीच अस्थिरता असल्याचं दिसून आलं.
आज बाजार बंद होताना Adani Enterprises, Axis Bank, Hindalco Industries, JSW Steel आणि TCS कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. तर Tech Mahindra, Infosys, HCL Technologies, Wipro आणि Hero MotoCorp या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. आयटी, पॉवर आणि सार्वजनिक बँका ही क्षेत्रं सोडली तर इतर सर्वच शेअर्समध्ये आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.
शेअर बाजाराची सुरूवात तेजीने, पण नंतर घसरण सुरू
आज शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स 289 अंकानी उसळी घेत 60550 वर उघडला. तसेच निफ्टी 82 अंकानी वाढून 18033 वर उघडल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र शेअर बाजारामध्ये पुन्हा घसरण सुरू झाली. बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं.
रुपयाच्या किमतीत 28 पैशांची घसरण
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये 28 पैशांची घसरण झाली. आज रुपयाची किंमत 81.61 इतकी आहे.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Tech Mahindra- 3.12 टक्के
- HCL Tech- 1.48 टक्के
- Infosys- 1.45 टक्के
- Wipro- 1.19 टक्के
- Hero Motocorp- 1.11 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Adani Enterpris- 2.72 टक्के
- Axis Bank- 2.25 टक्के
- JSW Steel- 1.21 टक्के
- TCS- 1.20 टक्के
- Hindalco- 1.12 टक्के
ही बातमी वाचा :