एक्स्प्लोर

Jayant Patil & Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांच्या शेलक्या टीकेवर जयंत पाटील पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, 'आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही'

Jayant Patil & Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकर हे सातत्याने जयंत पाटील यांच्यावर जहरी आणि आक्रमक भाषेत टीका करत आहेत. यावरुन देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना समजही दिली होती.

Jayant Patil & Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अत्यंत खालच्या थराला जात टीका केली होती. गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले होते. यावरुन बराच गदारोळ झाला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपीचंद पडळकर यांना समजही दिली होती. मात्र, त्यानंतरही गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जहरी भाषेत टीका सुरुच ठेवली होती. परंतु, या सगळ्याला जयंत पाटील यांनी एकदाही समोर येऊन प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यामुळे जयंत पाटील नेमके काय करत आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळाला पडला होता. या पार्श्वभूमीवर नुकत्याच इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले.

वेळ येईल तेव्हा आम्ही या सगळ्याचे उत्तर देऊ, तोपर्यंत वाट बघू. टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम तर होणारच. मी मागे एकदा म्हटलं होतं की, 'आपलं नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाय आणि सगळ्यांना हाणलं नाय तर जयंत पाटील माझं नाव नाही.' जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावर उपस्थित समर्थकांनी एकच जल्लोष केला.

गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिली होती, असे मी समजतो. त्यामधून त्यांनी काय बोध घेतला मला माहिती नाही. माझ्याविरोधात सगळ्यांनी मिळून बऱ्याच गोष्टी केल्या. याची चौकशी करा, त्याची चौकशी करा, असे अनेकजण बोलले. मला काहीही अडचण नाही. फक्त बोलू नका, माझी चौकशी कराच, असे सांगत जयंत पाटील यांनी दंड थोपटले. एका व्यक्तीने माझ्या आईवडिलांबद्दल चुकीची भाषा वापरली, त्यानंतर या व्यक्तीच्या समर्थनासाठी सगळ्यांनी मिळून सभा घेतली. भाजपमध्ये हा प्रकार मी कधी बघितला नव्हता. या सगळ्यामुळे आमच्या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. लोकांची प्रतिक्रिया वेगळी आहे. हे सगळं जाणुनबुजून केले जात आहे, ही लोकांची खात्री आहे. निवडणुकीत याची प्रचिती येईल. या सगळ्याला लोकांनी मतपेटीतूनच उत्तर दिले पाहिजे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

NCP Sharad Pawar Camp: तुम्ही शांत का, जयंत पाटील म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडल्यापासून तुम्ही शांत का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे, याविषयी जयंत पाटील यांना विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी म्हटले की, मी प्रदेशाध्यक्ष असताना माझ्या मतदारसंघातील लोकांना भेटू शकत नव्हतो. माझा मतदारसंघातील जनसंपर्क बराच कमी झाला होता. पण आता प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नसल्याने आता मला लोकांमध्ये जाऊन त्यांना भेटता येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

आणखी वाचा

जयंत्या, जातीवंत पाटील असशील तर तारीख आणि वेळ सांग, मी वाळव्यात येतो; गोपीचंद पडळकर पुन्हा घसरले

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Embed widget