एक्स्प्लोर
Petrol Pump Robbery | केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या तीन पेट्रोल पंपावर दरोडा
मुक्ताईनगर तालुक्यातल्या करकी गावाजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील तीन पेट्रोल पंपांवर दरोडा पडला आहे. रात्री अकरा ते साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली. दरोडेखोरांनी केंद्रीय मंत्री Raksha Khadse यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावरही दरोडा टाकला. चार ते पाच दरोडेखोर या ठिकाणी आले होते. त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. शस्त्रांचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांकडून एक ते सव्वा लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्यापही पोलिसांना यश मिळालेले नाही. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















