(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market Updates: शेअर बाजार गडगडला, Nifty 15,400 वर तर Sensex 709 अंकांनी घसरला
Stock Market : आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मेटल क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुंबई: शेअर बाजारातील मंगळवारची तेजी कायम ठेवता आली नसून आज शेअर बाजारात चांगलीच घसरण झाली. आज शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 709 अंकांची घसरण झाली असून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 225 अंकांची घसरण झाली आहे. सेन्सेक्समध्ये 1.35 टक्क्यांची घसरण होऊन तो 51,822 अंकांवर स्थिरावला तर निफ्टीमध्ये 1.44 टक्क्यांची घसरण होऊन तो 15,413 अंकावर स्थिरावला.
आज शेअर बाजार बंद होताना 1218 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 2025 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज 105 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
आज जवळपास सर्वच क्षेत्रातल्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅपमध्ये1.5 टक्के तर स्मॉल कॅपमध्ये 1 टक्क्याची घसरण झाली आहे. मेटल क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. शेअर बाजार बंद होतांना Hindalco Industries, UPL, Tata Steel, JSW Steel आणि Wipro यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली. तर PCL, Hero MotoCorp, TCS, Maruti Suzuki आणि Power Grid Corporation या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली.
रुपयाची विक्रमी घसरण
आज डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किमतीमध्ये विक्रमी घसरण झाली आहे. आज रुपयाची किंमत 78.38 इतकी झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- BPCL- 1.56 टक्के
- Hero Motocorp- 1.01 टक्के
- TCS- 0.34 टक्के
- Power Grid Corp- 0.14 टक्के
- Maruti Suzuki- 0.03 टक्के
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- Hindalco- 6.72 टक्के
- UPL- 6.20 टक्के
- Tata Steel- 5.28 टक्के
- JSW Steel- 4.48 टक्के
- Wipro- 3.27 टक्के
महत्त्वाच्या बातम्या: