भारताची आघाडीची पोलाद कंपनी देत आहे 1750 टक्के डिव्हिडंड, जाणून घ्या एक्स-डिव्हिडंडची तारीख
Jsw Steel : सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आता फक्त डिव्हिडंडचा आधार आहे. त्रैमासिक निकाल जाहीर झाल्यावर अनेक कंपन्यांनी लाभांश जाहीर करतात.
Jsw Steel : सातत्याने घसरणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूकदारांना आता फक्त डिव्हिडंडचा आधार आहे. त्रैमासिक निकाल जाहीर झाल्यावर अनेक कंपन्यांनी लाभांश जाहीर करतात. जेएसडब्ल्यू ग्रुप कंपनीने मे महिन्यात अंतिम लाभांश जाहीर केला. कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 1750 टक्के लाभांश देणार आहे. तसेच एक्स-डिव्हिडंडची तारीखही जाहीर केली आहे.
तुम्हाला किती डिव्हिडंड मिळेल
कंपनीच्या संचालकांनी प्रति शेअर 17.35 रुपये लाभांश देण्याची शिफारस केली आहे. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य रु 1 आहे, त्यानुसार JSW स्टील प्रत्येक शेअरवर 1735 टक्के लाभांश देत आहे. हा लाभांश गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी दिला जातो आहे. कंपनीने 4 जुलै ही एक्स-डिव्हिडंडची तारीख निश्चित केली आहे. एक्स-डिव्हिडंड तारीख ही आहे ज्यापूर्वी तुम्ही शेअर्स खरेदी केल्यास तुम्हाला लाभांश दिला जाईल असं कंपनीने बीएसईला सांगितले होते.
कंपनीच्या शेअर्सची स्थिती
सोमवारी जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर 550 रुपयांवर बंद झाला. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 790 आणि निम्न 520 रुपये आहे. त्याची प्रति शेअर कमाई (EPS) 85.49 रुपये आहे. 5 वर्षात हा मल्टीबॅगर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना 178 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा लाभांश इतिहासही चांगला आहे. गेल्या 5 वर्षांपासून सातत्याने लाभांश जाहीर केला आहे. कंपनीने 2021 मध्ये 6.50 रुपये आणि 2020 मध्ये प्रति शेअर 2 असा अंतिम लाभांश दिला होता.
कंपनीची आर्थिक स्थिती
जेएसडब्लू स्टीलचे मार्केट कॅप 134,059 कोटी आहे. कंपनीने 83.89 टक्के वार्षिक वाढीसह 3 वर्षांच्या सीएजीआरला मागे टाकले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, कंपनीने 3343 कोटी रुपयांचा नफा नोंदवला, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा 20 टक्के कमी होता. या कालावधीत कंपनीने 46,895 कोटी रुपयांसह तिची आतापर्यंतची सर्वाधिक तिमाही कमाई केली जेएसडब्लू स्टीलची मूळ कंपनी जेएसडब्लू समूह आहे. ही भारतातील आघाडीच्या पोलाद कंपन्यांपैकी एक आहे. त्याची कर्नाटक, तामिळनाडू आणि महाराष्ट्रात उत्पादन युनिट्स आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Insurance : कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी! डिसेंबरपर्यंत संपूर्ण देशात विमा योजनेचा केंद्राचा निर्णय
Share Market: शेअर बाजारातील घसरणीला लगाम, Nifty 15,300 वर तर Sensex 237 अंकांनी वधारला