(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market: दिवसभरातील अस्थिरतेनंतर शेअर बाजार सावरला, बँकिंग इंडेक्समध्ये वाढ तर उर्जा, रिअॅलिटी, मेटल इंडेक्समध्ये घसरण
Stock Market Updates: उर्जा, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये एका टक्क्यांची घसरण झाली तर बँकिंग इंडेक्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: आज दिवसभरात शेअर् बाजारात मोठी अस्थिरता दिसून आली. शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली असली तरी बाजार बंद होताना मात्र तो काहीसा सावरल्याचं दिसून आलं. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 107 अंकांनी वाढला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6 अंकांनी वाढला. सेन्सेक्समध्ये आज 0.17 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,980 अंकावर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.03 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,409 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही 162 अंकांची वाढ होऊन तो 42,535 अंकांवर स्थिरावला.
आज बाजार बंद होताना एकूण 1394 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 2011 शेअर्समध्ये घट झाली. तर एकूण 115 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज शेअर बाजार बंद होताना
Kotak Mahindra Bank, Coal India, HDFC Bank, Dr Reddy's Laboratories आणि HUL कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Apollo Hospitals, Adani Enterprises, Hindalco Industries, Adani Ports आणि JSW Steel कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज शेअर बाजार बंद होताना उर्जा, रिअॅलिटी आणि मेटलच्या इंडेक्समध्ये एका टक्क्यांची घसरण झाली तर बँकिंग इंडेक्समध्ये खरेदी झाल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप इंडेक्समध्ये आज 0.6 टक्क्यांनी वाढ झाली. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 0.3 टक्क्यांची घसरण झाली.
रुपया 20 पैशाने घसरला
डॉलरच्या तुलनेत आज रुपयाची किंमत 20 पैशांनी घसरली. आज रुपयाची किंमत ही 81.30 इतकी असून मंगळवारी ती 81.10 इतकी होती.
शेअर बाजाराची सुरुवात
आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 164.36 अंकांच्या घसरणीसह 61,708.63 वर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 5.15 अंकांच्या घसरणीसह 18,398.25 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 17 शेअर्समध्ये घसरण होती. निफ्टीत 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजीसह व्यवहार सुरू होता. तर, 29 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
या शेअर्समध्ये वाढ झाली
- Kotak Mahindra- 2.80 टक्के
- Coal India- 1.18 टक्के
- Dr Reddys Labs- 1.07 टक्के
- HDFC Bank- 0.86 टक्के
- HUL- 0.83 टक्के
या शेअर्समध्ये घसरण झाली
- Apollo Hospital- 2.88 टक्के
- Adani Enterpris- 2.49 टक्के
- Adani Ports- 2.16 टक्के
- Hindalco- 2.08 टक्के
- JSW Steel- 1.95 टक्के