Share Market : सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, Sensex 257 अंकांनी वाढला
Stock Market Updates : ऑटो , बँक, कॅपिटल गुड्स, मेटल, फार्मा, ऑईल अॅन्ड गॅस आणि रिअॅलिटीमध्ये आज खरेदी झाल्याचं दिसून आलं.
मुंबई: आज सकाळच्या घसरणीनंतर शेअर बाजार (Stock Market Updates) पुन्हा एकदा सावरल्याचं दिसून आलं. सलग दोन सत्रांमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. पण आज गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल दिसून आला. शेअर बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 257 अंकांची वाढ झाली तर निफ्टीमध्ये (Nifty) 86 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.44 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,031 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 0.50 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,577 अंकांवर स्थिरावला.
शेअर बाजारात आज निफ्टी बँक इंडेक्समध्ये 399 अंकांची वाढ झाली असून तो 38,697 वर पोहोचला. 2077 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1235 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. आज एकूण 146 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज M&M, Eicher Motors, Bajaj Finserv, Titan Company आणि Tata Steel या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर Infosys, TCS, Divis Labs, HUL and HCL Technologies या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली.
आज शेअर बाजारात ऑटो , बँक, कॅपिटल गुड्स, मेटल, फार्मा, ऑईल अॅन्ड गॅस आणि रिअॅलिटीमध्ये आज खरेदी झाल्याचं दिसून आलं. तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांवर आज काहीसा दबाव असल्याचं दिसून आलं. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं.
शेअर बाजाराची सुरवात घसरणीने
शेअर बाजार सुरु झाल्यानंतर झालेल्या पडझडीनंतर काही वेळाने बाजार सावरण्यास सुरुवात झाली. सेन्सेक्स 567 अंकांच्या घसरणीसह 58,205 अंकांवर खुला झाला. तर निफ्टी निर्देशांक 133.35 अंकांच्या घसरणीसह 17,357.35 अंकांवर खुला झाला होता. त्यानंतर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. त्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 10 अंकांनी वधारत 58,784.46 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी निर्देशांक 2.75 अंकांनी वधारत 17,493.45 अंकांवर व्यवहार करत होता.
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली
- M&M- 3.78 टक्के
- Eicher Motors- 3.02 टक्के
- Bajaj Finserv- 2.72 टक्के
- Titan Company- 2.59 टक्के
- Tata Steel- 2.43 टक्के
या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली
- Infosys- 2.11 टक्के
- TCS- 2.09 टक्के
- Divis Labs- 1.35 टक्के
- HCL Tech- 1.31 टक्के
- HUL- 1.29 टक्के