Share Market : शेअर बाजारातील घसरणीला लगाम; Nifty 16,000 वर तर Sensex 503 अंकांनी वधारला
Stock Market : मेटल, उर्जा, आयटी, रिअॅलिटी, बँक आणि ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-3 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

मुंबई: शेअर बाजारातील घसरणीला अखेर लगाम लागला असून आज सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 503 अंकांनी वाढला तर निफ्टीही 144 अंकानी वाढला. सेन्सेक्समध्ये 0.94 टक्क्यांची वाढ होऊन तो 54,252 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 0.90 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,170 वर पोहोचला आहे.
आज 1712 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1509 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 126 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.
आज बाजार बंद होताना मेटल, उर्जा, आयटी, रिअॅलिटी, बँक आणि ऑईल अॅन्ड गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-3 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅपमध्ये 1.4 टक्के तर स्मॉलकॅपमध्ये 0.78 टक्क्यांची वाढ झाली आहे.
गुरुवारी शेअर बाजारात Tata Steel, JSW Steel, Apollo Hospitals, SBI आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली असून ITC, UPL, Divis Labs, Sun Pharma आणि Reliance Industries या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
शेअर बाजाराची सुरवात घसरणीने
आज शेअर बाजाराची सुरुवात झाली तेव्हा निफ्टी 79.20 अंकाच्या तेजी खुला झाला. निफ्टी 16105 अंकावर व्यवहार करत होता. त्यानंतर सेन्सेक्स निर्देशांकात 201.58 अंकाची तेजी दिसून आली. सेन्सेक्स निर्देशांक 53950.94 अंकावर सुरू झाला. त्यानंतर शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढू लागला. त्याच्या परिणामी घसरण सुरू झाली. सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये 213 अंकाची घसरण झाली. यावेळी सेन्सेक्स 53535 अंकावर व्यवहार करत होता. निफ्टीमध्ये 84.60 अंकाची घसरण दिसत असून 15941 अंकावर व्यवहार करत होता.
या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Tata Steel- 5.29
- JSW Steel- 4.40
- Apollo Hospital- 3.93
- SBI- 3.26
- HDFC Bank- 2.85
या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- ITC- 2.20
- UPL- 2.17
- Divis Labs- 2.01
- Sun Pharma- 1.23
- Reliance- 0.95























