Share Market : आठवड्याचा पहिलाच दिवस गुंवतणूकदारांसाठी चांगला, शेअर बाजारा वधारला, सेन्सेक्सची 465 अंकांची उसळण
Stock Market Updates : आज ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली.
मुंबई: आठवड्याचा पहिलाच दिवस आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगलाच फायदेशीर ठरला आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये आज 465 अंकांची वाढ झाली तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या निफ्टीमध्ये 127 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये आज 0.80 टक्क्यांची वाढ होऊन तो 58,853 अंकांवर पोहोचला तर निफ्टीमध्ये 0.73 अंकांची वाढ होऊन तो 17,525 अंकांवर स्थिरावला. बँक निफ्टीमध्येही आज 316 अंकांची वाढ होऊनत तो 38,237 अंकांवर पोहोचला.
आज शेअर बाजारामध्ये 1864 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली तर 1535 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घट झाली. तसेच 173 कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. आज शेअर बाजार बंद होताना M&M, Coal India, Bajaj Finserv, Hindalco Industries आणि HDFC Bank या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली. तर BPCL, SBI, UltraTech Cement, Britannia Industries आणि Nestle India या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घट झाली.
आज ऑटो, कॅपिटल गुड्स, मेटल आणि उर्जा या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली.
आज शेअर मार्केटची सुरूवात कशी झाली?
आजच्या व्यवहाराच्या सुरुवातीला, BSE 30-शेअर निर्देशांक सेन्सेक्स 29.78 अंकांच्या किंवा 0.051 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 58,417 वर उघडला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 4.00 अंकांच्या किंवा 0.023 टक्क्यांच्या वाढीसह 17,401.50 वर उघडला.
रुपया घसरला
डॉलरच्या तुलनेत आजही रुपयाची किंमत 19 पैशांनी घसरली असून रुपयाची आजची किंमत 79.65 पैसे इतकी आहे.
आज या कंपन्यांचे शेअर्स वधारले
- Coal India- 3.33 टक्के
- M&M- 3.30 टक्के
- Bajaj Finserv- 2.95 टक्के
- Hindalco- 2.58 टक्के
- HDFC Bank- 2.45 टक्के
आज या कंपन्यांचे शेअर्स घसरले
- BPCL- 3.20 टक्के
- SBI- 2.01 टक्के
- Britannia- 1.54 टक्के
- UltraTech Cement- 1.44 टक्के
- Nestle- 1.35 टक्के