Share Market : शेअर मार्केटमध्ये तिसऱ्या दिवशीही तेजी, Sensex 60 हजारांच्या पार तर Nifty 18 हजारांच्या जवळ
Stock Market LIVE Updates: आज मुंबई शेअर बाजार बंद होताना आयटी क्षेत्राचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले तर बँक, ऑटो, ऑईल आणि गॅस क्षेत्रातले शेअर्स 1-2 टक्क्यांनी वधारले.
मुंबई : नवीन वर्षात सलग तिसऱ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी कायम राहिली असून बुधवारी मार्केट बंद होताना सेन्सेक्स 367.22 अंकानी तर निफ्टी 120 अंकानी वधारला. सेन्सेक्समध्ये एकूण 0.61 टक्के वाढ होऊन तो 60 हजारांच्या पार गेला आहे. मार्केट बंद होताना सेन्सेक्स 60,223.15 अंकावर पोहोचला. निफ्टीमध्येही 120 अंकांची वाढ होऊन तो 17,925.30 वर पोहोचला. आज बँक, ऑटो, ऑईल आणि गॅस क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-2 टक्क्यांची वाढ झाली आहे तर आयटी क्षेत्राचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले आहेत.
Bajaj Finserv, Bajaj Finance, Kotak Mahindra Bank, JSW Steel आणि Grasim Industries या शेअर्सच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे तर Tech Mahindra, Infosys, HCL Technologies, Divis Labs आणि Wipro या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.
फार्मा, उर्जाट ऑटो, बँक, मेटल, ऑईल आणि गॅस या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1-2 टक्क्यांची वाढ झाली आहे.
या कंपन्यांचे शेअर वधारले
- Bajaj Finserv- 4.98 टक्के
- Bajaj Finance- 4.46 टक्के
- Kotak Mahindra- 3.75 टक्के
- SW Steel- 3.59 टक्के
- Grasim- 3.25 टक्के
या कंपन्यांचे शेअर घसरले
- Tech Mahindra- 2.92 टक्के
- Infosys- 2.87 टक्के
- HCL Tech- 1.70 टक्के
- Divis Labs- 1.37 टक्के
- Wipro- 1.11 टक्के
दरम्यान, मंगळवारीदेखील शेअर बाजारात तेजी राहिली होती. मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 672.71 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीमध्येही 179.55 अंकानी वाढ झाली होती. निफ्टी 17,805.25 अंकावर बंद झाला होता.
संबंधित बातम्या :