मोठी बातमी! सिडकोची घरे खरेदी करण्याची सुवर्णसंधी, दसऱ्यात तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार!
लवकरच सिडकोकडून तब्बल 40 हजार घरांसाठी सोडत प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे आता अनेकांना स्वस्तात घर घेण्याची नवी संधी निर्माण होणार आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या (MHADA House Lottery) मुंबई महामंडळाच्या लॉटरीची चर्चा आहे. या लॉटरीच्या माध्यमातून एकूण 2030 घरांची सोडत प्रक्रिया राबवली जात आहे. या सोडतीअंतर्गत कोणाला घरे मिळाली आणि कोणाला नाही हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, एकीकडे या लॉटरीची चर्चा होत असताना दुसरीकडे आता सिडकोने मोठी लॉटरी आणली आहे. या लॉटरीअंतर्गत तब्बल 40 हजार घरे विकली जाणार आहे. दसऱ्याला ही लॉटरी प्रक्रिया राबवली जाणार आहे.
परवडणारी घरे घेण्याची संधी
मिळालेल्या माहितीनुसार सिडकोने (CIDCO House Lottery) रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी निघणार आहे. येत्या दसऱ्याला सिडको ही लॉटरी घेऊन येणार आहे. त्यामुळे मुंबई तसेच मुंबई उपनगरांत राहणाऱ्यांना परवडणारी घरे घेण्याची ही सुवर्णसंधी आहे. सिडकोने आतापर्यंत रेल्वे स्थानकाशेजारी उभारलेल्या घरांची लॅाटरी कधीच काढलेली नाही.
40 हजार घरांची लॅाटरी निघणार
मात्र या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तब्बल 40 हजार घरांची लॅाटरी निघणार आहे. सिडकोने वाशी, सानपाडा, जुईनगर, खांनेदेश्वर, नेरूळ या मोक्याच्या ठिकाणी घरे बांधली आहेत. सिडकोकडून सध्या 67 हाजार घरांचे काम सुरू आहे. यातील साधारण 40 हाजार घरे बाधून पूर्ण झाली आहेत.
विमानतळाचे कामही प्रगतीपथावर
घरांबरोबर सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही प्रगतीपथावर आणले आहे. एक रनवे पूर्ण झाला असून दुसऱ्याचे काम सुरू आहे. काही दिवसात येथून सुखोई विमानाची चाचणी केली जाणार आहे.
म्हाडाकडून 2030 घरांची लॉटरी
दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचा 19 सप्टेंबर हा शेवटचा दिवस होता. पुढच्या महिन्यात या लॉटरीची सोडत जाहीर करण्यात येणार आहे. ऑगस्ट महिन्यात या लॉटरी प्रक्रियेची घोषणा केल्यानंतर ही घरे महाग आहेत, अशी भावना व्यक्त केली जात होती. त्यानंतर 2030 घरांपैकी काही घरे ही 10 ते 12 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता अनेकांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणआर आहे.
हेही वाचा :
20, 21, 22, 23 सप्टेंबर, चार दिवस बँका राहणार बंद, नेमकं कारण काय?