एक्स्प्लोर

Children's Day 2025 : मुलांसाठी योग्य विम्याने सुरक्षित उद्याची उभारणी; वाचा विमा योजनेचे महत्त्वाचे नियम

Children's Day 2025 : भारतात एकूण लोकसंख्येपैकी चतुर्थांश नागरिक 14 वर्षांखालील असल्याने आपले भविष्य तरुण आहे.

Children's Day 2025 : “प्रत्येक बालदिन आपल्याला ही जाणीव करून देतो की आपण जपलेली स्वप्ने सुरक्षित ठेवणे हीच आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे.” श्री राकेश जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, रिलायन्स जनरल इन्शुरन्स बालदिन हा आनंद, क्षमता आणि निरागसतेचा उत्सव आहे. पण या उत्सवामागे एक महत्त्वाचा प्रश्न दडलेला आहे. आपल्या मुलांना सक्षमपणे वाढता यावे, यासाठी आपण पुरेशा सुरक्षिततेची उभारणी करत आहोत का? भारतात एकूण लोकसंख्येपैकी चतुर्थांश नागरिक 14 वर्षांखालील असल्याने आपले भविष्य तरुण आहे. मात्र, या लोकसंख्यात्मक सामर्थ्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत तयारीची जोड मिळाल्यास त्याची खरी क्षमता उजागर होऊ शकते.

भारताचे आर्थिक परिदृश्य वेगाने बदलत आहे. 2020–21 मधील सुमारे ₹3.2 लाख कोटींच्या तुलनेत देशाचा एकूण आरोग्य खर्च 2024–25 मध्ये ₹6.1 लाख कोटींवर पोहोचून दुपटीहून अधिक वाढला आहे. तरीदेखील, कुटुंबांना आरोग्यखर्चाचा मोठा भार स्वतःच उचलावा लागत आहे. 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नॅशनल हेल्थ अकाउंट्सच्या आकडेवारीनुसार, एकूण आरोग्य खर्चापैकी सुमारे 39.4% खर्च हा ‘आउट-ऑफ-पॉकेट’ म्हणजेच वैयक्तिक खर्च आहे. एका वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळे वर्षानुवर्षे केलेली बचत कोलमडू शकते आणि अनेकदा कुटुंबांना शिक्षण किंवा इतर आवश्यक गरजांमध्ये तडजोड करावी लागते. ज्या मुलांच्या भविष्याचा पाया असतात.

शिक्षणाचा वाढता खर्च ही आणखी एक मोठी चिंता आहे. भारतातील शिक्षण महागाई दर 10-12% च्या आसपास असल्याने उच्च शिक्षणाचा खर्च आठ ते दहा वर्षांत दुप्पट होत आहे. आज जो चार वर्षांचा अभ्यासक्रम ₹10 लाखांमध्ये पूर्ण होतो, तो 2035 पर्यंत ₹20-22 लाखांपर्यंत वाढू शकतो. वाढती जीवनशैलीची किंमत आणि आर्थिक अनिश्चितता लक्षात घेतली तर, कुटुंबांनी आर्थिक संरक्षणाला प्राधान्य देणे अधिकाधिक महत्त्वाचे बनले आहे.

भारताचा विमा प्रवेशदर मात्र अद्याप कमीच आहे. विमा नियामक प्राधिकरण (IRDAI) च्या अहवालानुसार देशातील एकूण विमा प्रवेशदर GDP च्या केवळ 3.7% असून, नॉन-लाइफ विमा फक्त 1% आहे. हा मोठा संरक्षण-अभाव अनेक कुटुंबांना, आणि त्यांच्याबरोबरच मुलांना, आर्थिकदृष्ट्या असुरक्षित ठेवतो. जागरूकता वाढत असली आणि नवनवीन विमा उत्पादने उपलब्ध असली तरीही अनेक भारतीय कुटुंबे विम्याला अजूनही ‘पर्यायी’ म्हणूनच पाहतात.

कुटुंब आर्थिकदृष्ट्या संरक्षित असेल तर मुलांनाही भावनिक सुरक्षितता मिळते. कुटुंबासाठीचा हेल्थ फ्लोटर प्लॅन दर्जेदार आरोग्यसेवा अबाधित ठेवतो. टर्म प्लॅन किंवा उत्पन्न संरक्षण योजना कमावत्या व्यक्तीला काही अनपेक्षित प्रसंग आल्यास मुलांचे शिक्षण आणि जीवनमान सुरक्षित ठेवते. घर विमा जो भारतातील 1% पेक्षा कमी कुटुंबांकडे आहे. केवळ मालमत्तेचेच संरक्षण करत नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या स्थैर्याचे रक्षण करतो. ही विमा उत्पादने केवळ आर्थिक साधने नाहीत; ती सातत्य, स्थिरता आणि सुरक्षिततेची हमी देतात.

यामध्ये फक्त कुटुंबांचीच नव्हे तर विमा उद्योगाचीही मोठी जबाबदारी आहे. विविध सामाजिक-आर्थिक गटांसाठी संरक्षण अधिक सुलभ, परवडणारे आणि उपयुक्त बनवणे ही उद्योगाची महत्वपूर्ण भूमिका आहे. सोपी उत्पादने, सहज डिजिटल प्रक्रिया, आणि छोट्या मुलांसह असलेल्या कुटुंबांसाठी तंतोतंत तयार केलेले उपाय यामुळे संरक्षण-अंतर भरून काढता येऊ शकते. भारत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने पुढे जात असताना सर्वसमावेशक संरक्षण तितकेच आवश्यक आहे.

म्हणूनच बालदिन ही केवळ उत्सव साजरा करण्याची नव्हे, तर मुलांचे संरक्षण करण्याचीही आठवण आहे. प्रेम आणि प्रोत्साहन त्यांच्या स्वप्नांना दिशा देतात. पण योग्य तयारी त्यांना अनिश्चिततेपासून दूर ठेवते. आपल्या मुलांसाठी सुरक्षित उद्या निर्माण करण्यासाठी महत्वाचे आहेत. आज घेतलेले सुजाण निर्णय, प्रत्येक विमा योजना आणि प्रत्येक पॉलिसी जी त्यांच्या भविष्याची पायाभरणी अधिक मजबूत करते.

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget