एक्स्प्लोर

Bank Fraud: चेकने फसवणूक झालेल्यांना अॅक्सिस बँक देणार 74 लाखांची नुकसानभरपाई;जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Axis Bank : फसवणूक झालेल्या पाच ग्राहकांना 73.93 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश अॅक्सिस बँकेला देण्यात आले आहेत. 15 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Bank Fraud Case :  चेक फ्रॉड प्रकरणात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगाने (NCDRC) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. फसवणूक झालेल्या पाच ग्राहकांना 73.93 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश अॅक्सिस बँकेला (Axis Bank) देण्यात आले आहेत. 15 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

काय आहे प्रकरण?

24 मे 2008 रोजी चेक फ्रॉड पीडित व्यक्ती आपल्या  बँक खात्यातून काही पैसे काढण्यासाठी आली होती. त्यावेळी त्या व्यक्तीच्या खात्यात 11.93 लाख रुपये होते, परंतु नंतर बँकेने त्याला सांगितले की त्यावेळी त्याच्या खात्यात फक्त 10,000 रुपये शिल्लक आहेत.अशा परिस्थितीत गुरविंदर सिंग नावाच्या व्यक्तीने बनावट चेक जारी करून पीडित व्यक्तीच्या खात्यातून 11.83 लाख रुपये काढल्याचे तपासात आढळून आले. मात्र, या प्रकरणाची माहिती खातेदाराला नव्हती. अशाच प्रकारच्या आणखी चार घटना नोंदवण्यात आल्या. यामध्येही ज्यात बनावट चेकद्वारे ग्राहकांच्या खात्यातून एकूण 68.93 लाख रुपये काढण्यात आले. 

चेक फ्रॉड प्रकरणात अॅक्सिस बँकेने काय केले?

चेक फ्रॉड प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बँकेने मुख्य संशयित आरोपी गुरविंदर सिंहच्या विरोधात IPC कलम 420, 468, 471 आणि 120-बी अंतर्गत एफआयआर दाखल केला. बँकेने या चेक फ्रॉडची माहिती रिझर्व्ह बँकेला दिली. त्यानंतर अॅक्सिस बँकेने प्रकरणाच्या माहितीसाठी एका विशेष पथकाची स्थापना केली. या पथकाची स्थापना 14 जुलै 2008 रोजी झाली. 

या तपास पथकाला आढळले की, सर्व बँक खाते सुरू करण्यापूर्वी केवायसी नियमांचे पालन करण्यात आले होते.अॅक्सिस बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांचा बचाव करताना बँक अधिकाऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या हेतूने काम केले नसल्याचे सांगितले. बँकेने NCDRCमध्ये सांगितले की, या प्रकरणात तातडीने एफआयआर दाखल करण्यापासून ते तपास पूर्ण करण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 

 NCDRC ने काय आदेश दिले?

पीडित व्यक्तींनी फसवणुकीद्वारे गमावलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई केली. हे प्रकरण जिल्हा ग्राहक मंच, राज्य ग्राहक आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून एनसीडीआरसीपर्यंत पोहोचले. राज्य ग्राहक आयोगाचा आदेश लागू ठेवत एनसीडीआरसीने सांगितले की, मतदार कार्ड, वीजबिल, फोन बिल, पासपोर्ट आदी कागदपत्रे मिळाल्यानंतरही बँकेने केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. अशा परिस्थितीत, NCDRC ने बँकेला 68.93 लाख रुपयांची फसवणूक करून परतफेड करण्याचे आदेश दिलेत. त्याशिवाय बँकेने दंड म्हणून पाच तक्रारदारांना अतिरिक्त 5 लाख रुपयांची रक्कम देण्याचेही निर्देश दिले. 

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
तुम्ही कोणतं कार्ड वापरता? Airtel  चा ग्राहकांना मोठा दणका! सर्वात स्वस्त प्लॅन टाकला काढून, आता नवीन प्लॅन कोणता?
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Vinod Tawde Meet: सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतून प्रवास; जलजीवन मिशनची बैठक सोडून दोघेही निघून गेले, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Embed widget