एक्स्प्लोर

पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या, पोलीस निरीक्षकाचं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

PI Letter to CM Eknath Shinde : एका पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली आहे.

PI Letter to CM Eknath Shinde : धुळे (Dhule) पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहून पोलिसांना (Police) दिवाळी बोनस (Diwali Bonus) म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली आहे. "मुख्यमंत्री तुम्हाला सगळे अनाथांचा नाथ एकनाथ म्हणतात. तुम्ही दयाळू आहात. त्यामुळे पोलिसांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या," अशी विनवणी या पत्रात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांचे कार्यालय अशा विविध कार्यालंयामध्ये हे पत्र पाठवण्यात आलं आहे. 

पोलीस निरीक्षक आर आर चव्हाण यांनी हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात पोलीस निरीक्षक चव्हाण पुढे म्हणतात की पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतीही संघटना नाही. त्यामुळे पोलिसांना कोणी वाली नाही. परिणामी सरकार दरबारी पोलिसांच्या प्रश्नांची, समस्यांची दखल घेतली जात नाही. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर तडजोड करण्याची सवय असते. तशीच तडजोड करुन फक्त एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून द्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

"सध्या महाराष्ट्रातील जनता म्हणते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दयाळू, अनाथांचा नाथ एकनाथ आहेत. तसंच माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे आम्हा पोलिसांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून 76 दिवस 12 ते 15 तास जास्तीचे कर्तव्ये केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी अपेक्षा आहे," असं पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.

पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार द्या, पोलीस निरीक्षकाचं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना पत्र

पोलीस निरीक्षकाने पत्रात काय म्हटलंय?

*पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो. एका वर्षात 52 शनिवार येतात. 

*त्याचबरोबर पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 24 पगारी सुट्या जास्त मिळतात. 

* असे वर्षातील 52+24 =76  असे 76 दिवस पोलिसांना 12 ते 15 तास जास्त काम करावे लागते. त्यामुळे तुम्ही दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार वाढवून द्यावा.

महापालिका कर्मचाऱ्यांना किती बोनस मिळणार?
शिंदे सरकार मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदाचा दिवाळी बोनस किती देणार? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण गेल्या वर्षी ठाकरे सरकारने महापालिका कर्मचाऱ्याना 20 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर केला होता. परंतु दिवाळी बोनस बाबत महापालिका कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. ठाकरे सरकारने जाहीर केलेला 20 हजार रुपये दिवाळी बोनस यावर्षीही महागाई भत्त्यासह वाढवून मिळावा, अशी मागणी  समन्वय समितीने केली आहे. तर वार्षिक पगाराच्या 20 टक्के म्हणजे 50 हजार रुपयांपर्यंतच्या दिवाळी बोनस देण्याची मागणी शशांक राव यांच्या द म्युनिसिपल युनियनकडून करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी आज दिवाळीतील सानुग्रह अनुदानाच्या विषयावर महापालिका कर्मचारी समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. महापालिका कामगार संघटनांचे नेतेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Decision : पोलिसांची 20 हजार पदं भरणार, चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव; मंत्रिमंडळाचे निर्णय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 मे 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines : 6.30 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 14 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Ghatkopar Hoarding Falls: अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
अनधिकृत होर्डिंग, आजूबाजूच्या झाडांवर विषप्रयोग...; दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती आली समोर
Weather Updates: पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
पाऊस कधी येणार? मान्सूनबाबत हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट, अंदमानमध्ये 'या' तारखेला आगमन
Shah Rukh Khan : शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
शाहरुख खानने 'या' चित्रपटात दिलाय इंटिमेट सीन; पण चाहत्यांना कधीच पाहता येणार नाही 'हा' सिनेमा
World Most Expensive Movie : जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
जगातला सर्वात महागडा चित्रपट कोणता? 'या' बजेटमध्ये अल्लू अर्जुनचा पुष्पा 20 वेळा बनेल
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Embed widget