एक्स्प्लोर

Canada-India Issue : भारताशी शत्रुत्व घेणं कॅनडाला महागात पडणार, दरवर्षी होणार तीन लाख कोटींचं नुकसान

भारत आणि कॅनडा (Canada-India Issue) यांच्यातील राजनैतिक वादाचा मोठा फटका कॅनडाला बसू शकतो. कारण भारत आणि कॅनडा या दोन देशात मोठा व्यापार चालतो.

Canada-India Issue : भारत आणि कॅनडा (Canada-India Issue) यांच्यातील राजनैतिक वादाचा मोठा फटका कॅनडाला बसू शकतो. कारण भारत आणि कॅनडा या दोन देशात मोठा व्यापार चालतो. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारताचे मोठं योगदान आहे. दरवर्षी भारतीयांचे तीन लाख कोटी रुपयांचे योगदान कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत आहे. तेथील अनेक क्षेत्रांमध्ये आणि व्यवसायांमध्ये भारतीयांची मोठी गुंतवणूक आहे. 

भारतीय दरवर्षी कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत तीन लाख कोटी रुपयांचे योगदान देतात. त्यामुळं कॅनडाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती अर्थतज्ज्ञांना वाटत आहे. कॅनडात  20 लाख भारतीयांचा अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात दबदबा आहे. भारतातून कॅनडामध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या 2 लाख विद्यार्थ्यांच्या शुल्कातून 75 हजार कोटी रुपयांचे योगदान कॅनडाला मिळाले आहे.

कॅनडातील या क्षेत्रांमध्ये भारतीय आघाडीवर 

भारतात राहणारे लोक कॅनडामधील मालमत्ता, आयटी, संशोधन, प्रवास आणि लघु व्यवसाय या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक करतात. भारतीय लोक कॅनडात प्रॉपर्टीमध्ये  सर्वाधिक गुंतवणूक करतात. भारतानंतर चीन कॅनडात दुसऱ्या क्रमांकावर गुंतवणूक करतात. भारतातील मूळ लोक व्हँकुव्हर, ग्रेटर टोरंटो, ब्रॅम्प्टन, मिसिसॉगा आणि ब्रिटिश कोलंबिया, ओंटारियो इथे दरवर्षी 50 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करतात. CII च्या अहवालानुसार, भारतीय कंपन्यांनी कॅनडामध्ये 2023 पर्यंत 41 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर 17 हजार नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. प्रवासाच्या दृष्टीने येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय जातात. 2022 मध्ये 1.10 लाख भारतीयांनी कॅनडात प्रवास केला. याशिवाय किराणामाल आणि रेस्टॉरंटसारख्या छोट्या व्यवसायात 70 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीयांनी केली आहे.

कॅनडात शिक्षण घेण्यात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या जास्त 

कॅनडामध्ये दरवर्षी शिकण्यासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, यावेळी भारत आणि कॅनडात सुरु असलेल्या वादामुळे व्हिसा आणि इतर कामांना होणारा विलंब यामुळं ही संख्या कमी होऊ शकते. दुसरीकडे, कॅनडाला फी म्हणून मिळणाऱ्या रकमेत तोटा सहन करावा लागू शकतो.

नेमकं प्रकरण काय?

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी शीख नेते हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येमागे भारत सरकार असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध चिघळले आहेत. कॅनडा सरकारने भारतीय राजनैतिक अधिकारी पवन कुमार राय यांची हकालपट्टी केली होती. यावर प्रत्युत्तर म्हणून भारतानेही दिल्लीतील कॅनडाच्या उच्चायुक्तालयातून एका वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं दोन्ही देशातील संबध ताणल्याचे दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

"कॅनडामध्ये निज्जरची हत्या हिंदुत्वाचा..."; कॅनडा-भारत तणावादरम्यान पाकिस्तानच्या पंतप्रधानांची प्रतिक्रिया, हिंदुत्त्वाची इसिसशी तुलना

 

महत्त्वाच्या बातम्या

Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !
पितांबरीने लाँच केली नैसर्गिक सुगंधाची देवभक्ती अगरबत्ती !

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Pune Nashik Highway Accident: भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
भीषण अपघात! भरधाव कंटेनर डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या ट्रकला धडकला; पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प; पुणे-नाशिक महामार्गावरील घटना
Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
Embed widget