अंबानी-अदानी नाही, तर 'हे' आहेत 2023 मधील 3 सर्वात तरुण अब्जाधीश
तरुण पिढीतील लोक अब्जाधीश होत आहेत. 2023 या चालू वर्षामध्ये तीन अब्जाधीश असे आहेत की ज्यांनी अद्याप वयाची 50 व्या वर्ष देखील पूर्ण केली नाहीत.
Business news : भारतात (India) 169 अब्जाधीश (billionaires) लोक आहेत. देशातील लोकांमध्ये व्यावसाय करण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळं तरुण पिढीतील लोक अब्जाधीश होत आहेत. 2023 या चालू वर्षामध्ये तीन अब्जाधीश असे आहेत की ज्यांनी अद्याप वयाची 50 व्या वर्ष देखील पूर्ण केली नाहीत.
मुकेश अंबानी हे संपूर्ण आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. तर गेल्या वर्षीपर्यंत गौतम अदानी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. सध्या ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पण आता श्रीमंतीची व्याख्या बदलत आहे. 2023 मध्ये तरुण पिढीतील अनेक लोक अब्जाधीश झाले आहेत. हे असे तीन लोक आहेत ज्यांनी वयाच्या 50 पेक्षा कमी वयात आपली चांगली कामगिरी दाखवली आहे. ब्लूमबर्गचा बिलियनेअर इंडेक्स असो की फोर्ब्सची 100 श्रीमंतांची यादी असो किंवा हुरुन इंडियाची ‘सेल्फ मेड बिझनेसमन ऑफ द इयर’ यादी असो, देशातील या तरुण पिढीची यावेळी चर्चा होत होती. देशातील काही तरुण अब्जाधीशांनी अद्याप वयाची 50 वर्ष देखील ओलांडलेली नाही. तर काही ठिकाणी लोकांचे वय 40 पेक्षा कमी आहे. ही 2023 ची यादी आहे.
निखिल कामथ
'झिरोधा' सारख्या शेअर ब्रोकरेज प्लॅटफॉर्मनुसार, देशातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामथ (37) आहेत. त्यांचे भाऊ नितीन कामथ (44) याचाही या यादीत समावेश आहे. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या 'रिच इंडियन लिस्ट'नुसार कामथ बंधू देशातील सर्वात तरुण अब्जाधीश आहेत. त्यांची संपत्ती 5.5 अब्ज डॉलर्स आहे.
बिन्नी आणि सचिन बन्सल
फ्लिपकार्टसारखे प्लॅटफॉर्म सुरू करणारे सचिन आणि बिन्नी बन्सल यांचे वयही 50 वर्षांपेक्षा कमी आहे. या दोघांनी 2015 मध्ये अब्जाधीशांचा दर्जा मिळवला होता. आता त्यांची संपत्ती वाढली आहे. सचिन फक्त 42 वर्षांचा आहे आणि बिन्नी 41 वर्षांचा आहे.
रवी मोदी
देशातील लाखो वधू-वरांना स्वप्नवत लग्नाची भेट देणारे रवी मोदी 46 वर्षांचे आहेत. ते सुमारे 3.4 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे 'मान्यवर' आणि 'मोहे' हे वेअर ब्रँड आहेत. हा ब्रँड लोकांना लग्नाशी संबंधित आठवणी जपण्याची संधी देतो. याशिवाय हे दोन्ही ब्रँड इतर भारतीय कपड्यांचाही व्यवहार करतात.
महत्त्वाच्या बातम्या: