खर्च भागवणे कठीण! देशातील सुमारे 67 टक्के कुटुंबांनी मोडली आपली बचत, 'या' गोष्टीवर होतो सर्वाधिक खर्च
मध्यमवर्गीय लोकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की झालेला पगार खर्च होतो कुठे? त्याचबरोबर पगारातून पैसे वाचवता येत नसल्यामुळे लोकांना कर्ज घ्यावे लागते किंवा बचतीतून पैसे काढावे लागतात.
Investment: नोकरदारांच्या खात्यात दर महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार (Payment) जमा होतो. मात्र, पगार मिळाल्यानंतर काही दिवसांत त्यांचे खाते रिकामे होते. लोकांचा अर्ध्याहून अधिक पगार घरभाडे, रेशन आणि ईएमआय भरण्यात जातो. अशा स्थितीत मध्यमवर्गीय लोकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे की पगार गेला कुठे? त्याचबरोबर पगारातून पैसे वाचवता येत नसल्यामुळे लोकांना कर्ज घ्यावे लागते किंवा बचतीतून पैसे काढावे लागतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण देशातील सुमारे 67 टक्के कुटुंबांनी आपली बचत गमावली आहे. चला जाणून घेऊया सर्वेक्षणात काय समोर आले आहे.
पगार येताच खर्च होतो, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला आणि नोकरदारांना पडला आहे.पगारातील पैसे वाचवता येत नसल्यामुळं लोकांना कर्ज काढावे लागत आहे किंवा केलेली बचतीचे मोडावी लागत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण देशातील सुमारे 67 टक्के कुटुंबांनी आपली बचत मोडलीआहे.
कुठे होतो सर्वाधिक पैसा खर्च?
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय कुटुंबांना एका महिन्यात मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 39 टक्के उत्पन्न मासिक रेशन आणि वाहनांच्या इंधानासाठी जाते. भारतीय कुटुंबांच्या मासिक उत्पन्नापैकी 19 टक्के रक्कम महिन्यासाठी रेशन खरेदीवर खर्च केली जाते आणि 8 टक्के रक्कम कार किंवा गाड्यांच्या इंधन खरेदीवर खर्च केली जाते. अशा स्थितीत गरजेनुसार त्यांना बचतीतून पैसे काढावे लागतात. यामागे अनेक कारणे असली तरी उपचारासाठी पैशांची कमतरता हे एक प्रमुख कारण आहे.
लोकांना केलेली बचत मोडावी लागतेय
सर्वेक्षण अहवालानुसार, 67 टक्के लोकांना त्यांची बचत मोडावी लागली आहे. यापैकी 8.2 टक्के लोक कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांच्या बचतीतून पैसे काढतात. त्याचवेळी, 15.2 लोक नोकरी गमावल्यामुळं आणि नुकसान झाल्यामुळं बचतीतून पैसे काढतात. 8 टक्के लोक लग्नासाठी बचतीतून पैसे काढतात. त्याचवेळी, 22 टक्के लोक उपचार आणि वैद्यकीय खर्चासाठी पैसे काढतात. यामध्ये 11 टक्के लोक असे आहेत जे आपल्या मुलांच्या शिक्षणासाठीही आपली बचत खर्च करतात. देशातील केवळ 33 टक्के लोक त्यांच्या बचतीतून पैसे काढत नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या: