एक्स्प्लोर

Prithviraj Chavan On Union Budget 2025: अर्थमंत्री म्हणाले, 12 लाखांपर्यंत कर माफ; पृथ्वीराज चव्हाणांनी केंद्र सरकारच्या घोषणेची हवाच काढली!

Prithviraj Chavan On Union Budget 2025: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Prithviraj Chavan On Union Budget 2025: केंद्र सरकारकडून आज (1 फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2025) मांडण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत अर्थसंकल्प 2025-26 सादर केला. यामध्ये मोदी सरकारने नोकरदारवर्गासाठी मोठी घोषणा केली. आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. याचा अर्थ महिन्याला एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कोणताच कर भरावा लागणार नाही. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरुन आता विविध प्रतिक्रिया येत आहे. याचदरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मोदी सरकारचं निवडणुकीतनंतरच अंदाजपत्रक आहे. निवडणुकीनंतर पहिल्या वर्षात काही कटू निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे आर्थिक सुधारणा करता येतात. असं काहीतरी होईल असं आम्हाला अपेक्षित होतं मात्र तसं झालं नाही. सगळ्यांना टॅक्सबाबत कौतुक आहे. आता 12 लाखपर्यंत टॅक्स नसेल असं म्हणतात. परंतु याचा लाभ घ्यायचा असेल तर आधी जी टॅक्समध्ये सूट मिळायची ती बंद होणार नाही. त्यामुळे खरंच लोकांना फायदा होईल असं वाटत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

...तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे?; पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

देशाचा आर्थिक विकासदर मंदावत आहे. सरकारने देखील ते मान्य केलं आहे. 2047 पर्यंत भारत विकसित होणार हे दिवा स्वप्न दाखवत आहात का?, ते याची नेमकी व्याख्या सांगत नाही. देश गरीब आहे परंतु लोकं गरीब आहेत अशी सध्या परिस्थितीत आहे. दरडोई उत्पन्नात आपण 147 क्रमांकावर आहोत. लोकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न वाढवण गरजेचे होतं मात्र तसं दिसत नाही, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. शेतकऱ्यांचे अश्रू पुसतील अशी अपेक्षा होती, परंतु असं काहीच केलं नाही. शिक्षण क्षेत्रात देखील काहीच केलं नाही. अर्थमंत्र्यानी कृषी विभागाचं कौतुक केलं. परंतु त्यांची प्रमुख मागणी हमी भाव मिळण्याचा कायदा याबाबत काहीच केलं नाही. आजही राज्यात दररोज 7 शेतकरी आत्महत्या करतायत. जर खर्चापेक्षा कमी उत्पन मिळालं तर शेतकरी आत्महत्या रोखणार कसे?, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. 10 लाख कोटी गुंतवणूक होणार अशी घोषणा केली. मात्र ते अस्तित्वात येईल असं वाटत नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले, आपण कुठे आहोत?

शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होईल, असं वाटत होतं मात्र तस काहीच होतं नाही. चीनने एआयबाबत अमेरिकेला मागे टाकले आहे. यात आपण कुठे आहोत हा प्रश्न आहे. 23 आयआयटी सुरू करण्यात आलं आहे. परंतु आता तिथल्या दर्जा खालावण्याची परिस्थिती आहे. कारण तिथ शिकवण्यासाठी स्टाफ नाहीय. विमा क्षेत्रात 100 टक्के परकीय गुंतवणूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आता परदेशी कंपन्या भारतात येतील. परदेशी विमा कंपन्या भारतात येतील. मात्र इथल्या विमा कंपन्यांना भक्कम करण गरजेचे आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. 

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
सोलापुरात पाणी पेटलं, महापालिका सभागृहात प्रचंड गोंधळ; नव्या योजनेला विरोध, दोन नगरसेवकांचे निलंबन
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
Embed widget