एक्स्प्लोर

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा, शेअर बाजार उघडताच निर्देशांकांची उसळी, पण....

लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात मोठे चढउतार होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (23 जुलै) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात देशाच्या पुढच्या वर्षभराच्या विकासाचे प्रतिबिंब झळकेल. म्हणूनच या अर्थसंकल्पाकडे सध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पाचे शेअर बाजारावरही पडसाद पडण्याची शक्यता आहे. त्याआधी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याचं दिसतंय. शेअर बाजार चालू झाल्यानंतर भांडवली बाजाराचे प्रमुख दोन्ही निर्देशांकांत फारशी वाढ झालेली नाही. 

राष्ट्रीय शेअर बाजाराची स्थिती काय?

राष्ट्रीय शेअर बाजाराबाबत बोलायचं झालं तर सोमवारी शेअर बाजार दिवसाअखेर 24,509.25 अंकांवर स्थिरावला होता. आज बाजार चालू झाल्यानंतर एनएसईमध्ये 24,568.90 अंकांपर्यंत वाढ झाली. शेअर बाजार चालू झाल्यानंतर निर्देशांकांत फारसा बदल झालेला दिसला नाही. म्हणजेच सध्या गुंतवणूकदार सावध पवित्र्यात आहेत.

मुंबई शेअर बाजाराची काय स्थिती?

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सोमवारी दिवसाअखेर 80,502.08 अंकांपर्यंत खाली आला होता. त्यानंतर आजा मंगळवारी सत्र चालू होताच सेन्सेक्सने 80,724.30 अंकांपर्यंत उसळी मारली. म्हणजेच कालच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराने 222.22 अंकांनी उसळी घेतली. 

केंद्र सरकारच्या तरतुदी, घोषणांकडे सर्वांचे लक्ष 

दरम्यान, आज अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून नेमकं काय निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी निर्मला सीतारामन शेती, महिला, रोजगार यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच उद्योग, आयटी, सेवा, फार्म या क्षेत्रांसाठीही केंद्र सरकार काय तरतुदी करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्राच्या तरतुदी आणि घोषणांनुसार आता शेअर बाजारात चढउतार पाहायला मिळू शकतात.

सोमवारच्या सत्रात काय घडलं?

दरम्यान, 22 जुलै रोजीच्या सत्राच्या शेवटीदेखील गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याचे दिसले.  23 जुलै रोजी दिवसाअखेर मुंबई शेअर बाजारात 102.57 अंकांची घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारा काल दिवसाअखेर 80,502.08 अंकांवर स्थिरावला. तर सोमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 21.65 अंकांची किरकोळ घसरण पाहायला मिळाली. देशाच्या आर्थिक पाहणी अहवालात चालू  आर्थिक वर्षात देशाच्या विकासाची गती मंदावण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे काल गुंतवणूकदारांत काही प्रमाणात अस्थिरता पाहायला मिळाली. त्यामुळे आज निर्मला सीतारामन कोणकोणत्या घोषणा करणारण? आकर्षक घोषणा करून त्या गुंतवणूकदारांची हीच भीती कमी करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

Union Budget 2024 Live Updates : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी नेमकं काय? कोणत्या घोषणा होणार?

Economic Survey : आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशाचा जीडीपी 6.5 ते 7 टक्के राहणार, आर्थिक पाहणी अहवालात सरकारचा अंदाज!

स्वातंत्र्य मिळाल्यापासून अर्थसंकल्प सादरीकरणात झालेत 'हे' महत्त्वाचे बदल, अनेक परंपरा बदलल्या; जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सTahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडेManoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan : आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
आपल्याकडे 33 कोटी देव...; पालकमंत्रिपदावरून प्रश्न विचारताच गिरीश महाजनांच्या उत्तरानं भुवया उंचावल्या!
Jayant Patil: दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
दावोसची गुंतवणूक PR Activity नसावी म्हणजे झालं! जयंत पाटलांनी सरकारला डिवचले, म्हणाले, 'मोठ्या मोठ्या वल्गना..'
Ajit Pawar: आम्हीदेखील शेतकरी.... शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण, म्हणाले..
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Embed widget