Union Budget 2022 : अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित होणार का?
Union Budget 2022 : अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित होणार का? जाणून घेऊया सविस्तर...
Union Budget 2022 : देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असतानाच यंदाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. देशात मॅक्रो परिस्थिती सुधारते आहे आणि सर्व विकास निर्देशक सकारात्मक संकेत देत आहेत. अशा स्थितीत शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांनाही अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत.
बाजार विकासाभिमुख आणि मागणीला चालना देणारे बजेट शोधत आहे. जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करणाऱ्या आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा क्षेत्रांसाठीही बाजाराला मोठ्या घोषणा हव्या आहेत. याबाबत झी-बिझनेसला प्रतिक्रिया देताना स्वस्तिका इन्व्हेस्ट मार्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील न्याती यांना बजेटकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले.
लोकांच्या 2022 च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. बाजारपेठ अशा अर्थसंकल्पाच्या शोधात आहे जो विकासाभिमुख आणि सुधारणा दोन्ही असेल. अर्थसंकल्पाने देशाच्या आर्थिक प्रगतीला मदत केली पाहिजे आणि आम्हाला आशा आहे की सरकार पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आपला वित्तीय खर्च उच्च ठेवेल असं न्याती यांनी म्हटलं.
गेल्या वेळी सरकारने असे करून विकासावर भर दिला होता. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अनेक घोषणा झाल्या असल्या तरी त्या सुरू ठेवण्याची गरज असल्याचं न्याती यांनी म्हटलं. सुनील न्याती यांनी मांडलेले काही मुद्दे पाहुया...
रोजगाराभिमुख क्षेत्राला चालना हवी
या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.
रिअल इस्टेट आणि कार उद्योगांमध्ये काही मोठ्या घोषणा झाल्या पाहिजेत, कारण हे दोन्ही उद्योग अनेक क्षेत्रात नोकऱ्या आणि वाढ देऊ शकतात.
सरकारने गृहकर्जासाठी कर लाभ वाढवला पाहिजे, जो गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहे.
वापर वाढवण्यावर भर द्या
गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, परंतु खप वाढवण्यावर थेट लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे पगारदार वर्गासाठी बाजाराला काही महत्त्वाच्या बातम्यांची अपेक्षा आहे.
त्याच वेळी, सरकारने मालमत्ता मुद्रीकरण (monetization) आणि निर्गुंतवणुकीबाबत (disinvestment) अधिक स्पष्टता प्रदान करावी अशी बाजाराची अपेक्षा आहे. पुरवठ्याच्या बाजूने जगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना, भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो. सरकार अर्थसंकल्पात याबाबत काही घोषणा करते का, याकडेही बाजाराचे लक्ष असणार आहे.
कर आकारणीवर अपेक्षा काय?
शेअर बाजाराशी संबंधित कर प्रणालीबाबत सुनील न्याती म्हणाले की, सिक्युरिटीज व्यवहार कर (STT) काढावा किंवा कमी करावा. कारण सुरुवातीला हे दीर्घकालीन भांडवली नफ्याऐवजी सुरू करण्यात आले होते, परंतु आता दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gains) (LTCG) आणि एसटीटी (STT) दोन्ही लागू आहेत जे गुंतवणूकदारांसाठी योग्य नाही.
भारतात शेअर बाजाराची व्याप्ती वाढत आहे, इतर उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा भारतीय बाजार अधिक गुंतवणूक अनुकूल बनण्यासाठी सरकार धोरणात्मक पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे LTCG आणि STT कमी करणे हे त्या दिशेने एक चांगले पाऊल ठरू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Budget 2022 on App: इंग्रजी किंवा हिंदीत वाचू शकाल अर्थसंकल्प; केंद्र सरकारने लॉन्च केलं अॅप
- Budget 2022: अर्थसंकल्प 2022 पासून ऑटोमोबाईल क्षेत्राच्या अपेक्षा काय, गाडी घेणं स्वस्त होणार का?
- Budget 2022: पीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वाढणार?; अर्थमंत्र्यांच्या घोषणेकडे लक्ष
- Budget 2022 : किती लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असावं?; लोक म्हणतात...