एक्स्प्लोर

Union Budget 2022 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार

Union Budget 2022 : आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा देणारा यंदाचा अर्थसंकल्प असणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Union Budget 2022 : आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. प्रथेप्रमाणे, वर्षाचं पहिलं अधिवेशन असल्यामुळं याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांच्या अभिभाषणानं होणार आहे. राष्ट्रपती सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून सहसा सरकारच्या उपलब्धी आणि भविष्यातील योजनांचा तपशील दिला जाईल. तसेच, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021-22 (Economic Survey) सादर करतील. ज्यामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीचे तपशीलवार वर्णन सादर करण्याबरोबरच आर्थिक-सामाजिक धोरणं आणि कार्यक्रमांची भविष्यातील दिशा दर्शविली जाईल.

संसद भवनाचं आजचं शेड्यूल : 

  • सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदींची पत्रकार परिषद 
  • सकाळी 10.55 मिनिटांनी राष्ट्रपती संसदेत पोहोचतील
  • सकाळी 11 वाजता राष्ट्रपतींचं अभिभाषण 
  • राष्ट्रपतींचे भाषण संपल्यानंतर अर्ध्या तासाने लोकसभेचं कामकाज सुरू होईल
  • आर्थिक सर्वेक्षण आधी लोकसभेत मांडणार
  • आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज आजसाठी तहकूब करण्यात आले
  • दुपारी 2.30 मिनिटांनी राज्यसभेचं कामकाज सुरु होईल
  • आर्थिक सर्वेक्षण राज्यसभेत सादर होईल 
  • त्यानंतर राज्यसभा तहकूब केली जाईल
  • संध्याकाळी 3.45 वाजता मुख्य आर्थिक सल्लागार माध्यमांसमोर हजर होतील

आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय? 

आर्थिक सर्वेक्षण अहवालात गेल्या एका वर्षातील देशातील आर्थिक गोष्टींचा लेखा-जोगा असतो. आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या जीडीपीचाही अंदाज लावला आहे. गेल्या एका वर्षात झालेल्या देशाचा विकासाची समिक्षाही केली जाते. आर्थिक सर्वेक्षण भविष्यासाठी सूचना देखील देतं. अर्थसंकल्पापूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहात आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. मुख्य आर्थिक सल्लागारांच्या नेतृत्त्वात आर्थिक सर्वेक्षण अहवाल तयार केला जातो. 

उद्या सादर होणार अर्थसंकल्प 

मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला चौथा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. 1 फेबुवारीला सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करतील. 2019 पासून ब्रीफेकसऐवजी बहीखात्याचा बदल मोदी सरकारनं केला. त्यामुळे निर्मला आपल्या बहीखात्यातून कुणाला दिलासा, कुणाला करवाढीचा फटका देणार? याची उत्सुकता सर्वांना आहेच. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांची रणधुमाळी ऐन भरात असतानाच हा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्यामुळे निवडणुकांची छाया या बजेटमध्ये दिसणार असल्याचं सर्व स्तरांतून बोललं जात आहे. कोरोनाच्या सावटात अर्थव्यवस्थेचं हे तिसरं वर्ष आहे. त्यामुळे त्यातून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी काय पावलं टाकली जातायत हेही पाहणंही महत्वाचं असेल.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'या' मुद्द्यांवरून होऊ शकतो गदारोळ 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाबाधित कुटुंबांना मदत पॅकेज, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, सीमेवर चीनसोबतची अडवणूक आणि अन्य काही मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचा निर्णय प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने घेतला आहे. "सीमेवर चीनची वाढती आक्रमकता आणि त्यामुळे सुरू असलेली अडवणूक, महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, एअर इंडियाचे खासगीकरण आणि इतर सरकारी कंपन्यांसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारला जाईल.

Union Budget 2022 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget