एक्स्प्लोर

Economic Survey 2022-23 Health : विविध अडचणींवर मात करत देशातील कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी; आर्थिक सर्वेक्षण अहवालात कौतुक

 Economic Survey 2022-23 Health : आर्थिक सर्वेक्षण अहवालात कोरोना लसीकरण मोहीमेचे कौतुक करण्यात आले आहे. विविध अडचणींवर मात करत या देशातील लसीकरण मोहीम पूर्ण करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Economic Survey 2022-23 Health : कोरोना महासाथीला अटकाव करण्यासाठी देशभरात राबवण्यात आलेल्या कोरोना लसीकरण (Coronavirus Vaccination) मोहिमेचे आर्थिक सर्वेक्षणात (Economic Survey 2022-23) कौतुक करण्यात आले आहे. कोरोना लसीकरणात मोठ्या प्रमाणावर आलेल्या अडचणींवर मात करत लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. 6 जानेवारी 2023 पर्यंत देशभरात 220 कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्यांपैकी 90 टक्के लोकांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती देण्यात आली. 

भारताने कोरोना लसीकरणाची मोहीम 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्यात आली. ही लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ठरली. कमी वेळेत अधिकाधिक लोकांना कोरोना लस देण्याचे आव्हान होते. 

आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले की, कोविनच्या (Co-Win) मजबूत डिजीटल पायाभूत सुविधेमुळे देशात 220 कोटी लस देणे शक्य झाले. कोरोना महासाथीची सुरुवात होण्याआधीच भारताकडून मोठ्या प्रमाणावरील लसीकरण मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. सरकारने 'अंत्योदय'चे मूलभूत तत्वज्ञानाला अनुसरून डिजीटल आरोग्य सेवा वितरणावर अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचे अहवालात म्हटले. 

भारतात कोविड-19 लसीकरणाचे नियोजन, अंमलबजावणी, देखरेख आणि मूल्यमापन करण्यासाठी, को-विन प्रणालीने संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी उपयुक्ता दाखवली. लसीकरणासाठी पुरवठा साखळीत जबाबदारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, प्लॅटफॉर्मने राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर (सरकारी आणि खाजगी) रिअल-टाइम स्टॉक ट्रॅकिंग प्रदान केले. त्यामुळे लशींचा अपव्यय टाळता आला. प्री-कोविन आधीच्या काळात लसींचा अपव्यय होत असे, तो टाळता आल्याकडे आर्थिक सर्वेक्षण अहवालात लक्ष वेधण्यात आले. 

कोविन अॅप हे 12 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याने नागरिकांना याचा वापर करताना मोठा फायदा झाला असल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, लसीकरण प्रमाणपत्र तयार करण्यात आले होते. 

आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडताना, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले की,  सहा जानेवारी 2023 पर्यंत देशभरात 220 कोटी कोरोना लस देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी 97 टक्के जणांना कोविडचा किमान एक डोस घेतला आहे. तर, 90 टक्के पात्र नागरिकांनी कोविडचे दोन्ही डोस घेतले आहेत. वय 12-14 वर्ष या वयोगटासाठी 16 मार्च 2022 पासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहेत. तर, 10 एप्रिल 2022 पासून 18 ते 59 वर्षाच्या नागरिकांसाठी खबरदारीचा तिसरा डोस देण्यास सुरुवात झाली.  जवळपास 22.4 कोटी डोस देण्यात आले आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Anand Ashram Video : 19 वर्षांनी आनंदाश्रमात पहिलं पाऊल, राज ठाकरेंचा संपूर्ण व्हिडीओRaj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला
Embed widget