2014 पासून प्रत्येक अधिवेशनापूर्वी विदेशातून खोडी काढली जायची, हवा द्यायला काही लोक तयार असायचे: नरेंद्र मोदी
Narendra Modi : सर्वांगीण विकासाच्या संकल्पासह मिशन मोडमध्ये पुढं जातोय असं नरेंद्र मोदी म्हणाले. नरेंद्र मोदींनी संसदीय अधिवेशनापूर्वी आर्थिक कामकाजाची त्रिसूत्री मांडली.

Budget 2025 नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या अधिवेशनापूर्वी संवाद साधला. मोदींनी यावेळी महालक्ष्मीला वंदन केलं. मोदी म्हणाले, महालक्ष्मी सिद्धी आणि विवेक देते. समृद्धी आणि कल्याण देते. यावेळी ते म्हणाले लक्ष्मीकडे प्रार्थना करतो की देशातील गरीब अन् मध्यमवर्ग समुदायावर कृपा राहावी. आमच्या प्रजासत्ताकाची 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, असं मोदी म्हणाले. प्रत्येक नागरिकासाठी सर्वाधिक गौरवाची बाब आहे. जगातील लोकशाही विश्वासाठी भारताचं सामर्थ्य आपलं विशेष स्थान निर्माण करतं, असं मोदी म्हणाले. देशातील जनतेनं तिसऱ्यांदा ही जबाबदारी दिली आहे. तिसऱ्या कार्यकाळातील हे पहिलं पूर्ण बजेट आहे. 2047 मध्ये जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होतील त्यासाठी विकसित भारताचा संकल्प सरकारनं घेतला आहे.
नरेंद्र मोदी पुढं म्हणाले, हा अर्थसंकल्प नवा विश्वास निर्माण करेल, नवी ऊर्जा देईल, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण विकसित झालेला असेल. 140 कोटी स्वत:च्या सामूहिक प्रयत्नातून या संकल्पाला परिपूर्ण करतील. तिसऱ्या टर्ममध्ये मिशन मोडमध्ये देशाला सर्वांगीण विकासाच्या दिशेनं, भौगोलिक, सामाजिक किंवा विभिन्न आर्थिक स्तर असतील. आम्ही सर्वांगीण विकासासाठी मिशन मोडमध्ये पुढं जातोय. इनोवेशन, इन्क्लूजन आणि इन्वेस्टमेंट हे आमच्या आर्थिक वाटचालीचे आधार राहिले आहेत, असं मोदी म्हणाले.
या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होईल, व्यापक मंथनानंतर देशाची ताकद वाढवणारे कायदे बनतील. महिलांच्या शक्तीला पुन्हा प्रस्थापित करणे. प्रत्येक महिलेला समान अधिकार मिळावेत यासाठी या अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म महत्त्वाचे आहेत. जेव्हा विकासाची वेगवान गती आवश्यक असते तेव्हा सर्वाधिक आवश्यकता रिफॉर्मची असते. केंद्र आणि राज्यानं मिळून परफॉर्म करायचं असतं. लोकांच्या सहभागातून ट्रॉन्सफॉरमेशन पाहू शकतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, आपला देश युवा आहे, युवा शक्ती आहे. आज जे 20 ते 25 वयाचे तरुण आहेत जेव्हा ते 45 ते 50 वर्षाचे होतील. तेव्हा विकसित भारताचे सर्वात मोठे लाभार्थी होतील. धोरण ठरवायच्या जागेवर ते बसलेले असतील. विकसित भारताच्या संकल्पाचा प्रवास, अथांग मेहनत आजचे आपले किशोरवयीन, तरुण त्यांच्यासाठी मोठी भेट ठरणार आहे. जे लोक 1930,1942 स्वातंत्र्याच्या लढ्यात होते. देशातील तरुण पिढी स्वातंत्र्यासाठी लढली. त्याची फळं 25 वर्षानंतर आलेल्या तरुणांना मिळाली. स्वातंत्र्यापूर्वीची ती 25 वर्ष स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याची संधी देऊन गेले. त्याप्रमाणं ही 25 वर्ष समृद्ध भारत, विकसित भारताच्या संकल्प ते सिद्धी, सिद्धी ते शिखरावर पोहोचण्यासाठी महत्त्वाची ठरतील, असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
या अर्थसंकल्पत सर्व खासदार विकसित भारतासाठी योगदान देतील. तरुण खासदारांसाठी चांगली संधी आहे. ते आज सभागृहात जितकी जागरुकता , सहभाग वाढवतील त्यांना विकसित भारताची फळ त्यांना पाहायला मिळणार आहे. युवा खासदारांसाठी चांगली संधी आहे. आपण देश आशा, आकांक्षांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होतील, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
हे पहिलं अधिवेशन असेल 2014 पासून ज्याच्या एक दोन दिवस अगोदर विदेशातून आग लावण्याचा प्रयत्न झालेला नाही. दहा वर्षांपासून, 2014 पासून पाहतोय प्रत्येक अधिवेशनापूर्वी कारस्थान करण्यासाठी लोक तयार असायचे, इथं त्याला हवा देण्यासाठी लोक तयार असायचे. पहिलं अधिवेशन असं असेल की अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी कोणत्याही विदेशी भागातून चिंगारी उठली नाही, असं मोदी म्हणाले.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
