Union Budget 2022 Highlights: कुठे दिलासा, कुठे निराशा; लोकसभेत सादर झाला आर्थिक वर्ष 2022-23 'अर्थसंकल्प'
Union Budget 2022 India Highlights : आज देशाचा आर्थिक वर्ष 2022-23 साठीचा अर्थसंकल्प सादर होणार. त्यासंदर्भातील प्रत्येक अपडेट्स फक्त एबीपी माझावर...
LIVE
Background
Union Budget 2022 : देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) आर्थिक वर्ष 2022-23 (Budget 2022) साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmal Sitharaman) सकाळी 9 वाजता आपल्या टीमसोबत अर्थमंत्रालयातून राष्ट्रपती भवनात जाण्यासाठी रवाना होतील. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.
प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते.
- अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 8.15 वाजता आपल्या निवास्थानाहून रवाना होतील
- निर्मला सीतारमण आणि अर्थसंकल्प (Budget 2022) तयार करणारी टीम सकाळी 9 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतील.
- राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सकाळी 10 वाजता निर्मला सीतारमण बजट ब्रीफ केससह संसदेत दाखल होतील. संसद भवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशल होईल.
- त्यानंतर संसद भवनात केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडेल, ज्यामध्ये अर्थसंकल्पाला औपचारिकरित्या मंजुरी देण्यात येईल.
- सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर होईल आणि अर्थमंत्री भाषण करतील
- बजेट स्पीचनंतर पंतप्रधान मोदी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर वक्तव्य देतील.
उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प - मुख्यमंत्री
Union Budget 2022 : वाढती बेरोजगारी, महागाई आणि सातत्याने कमी होत चाललेलं उत्पन्न यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे सुक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत, लोकांची क्रय शक्ती कमी होत असतांना खासगी क्षेत्रातील गुंतवणूक कमी होत आहे अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील अशी अपेक्षा होती परंतू लोकमनातील ही अस्वस्थता केंद्र सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प नोकरदारांसह सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
आजचा अर्थसंकल्प म्हणजे भुलभुलैय्या आणि फक्त घोषणांचा पाऊस : रविकांत तुपकर
केंद्र सरकारने आज मांडलेल्या अर्थसंकल्पावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी टीका केलीय. "या सरकारने मोठ्या घोषणा केल्या. मात्र अंमलबाजावणी होत नाही. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांचा कुठलाही फायदा होणार नाही. या अर्थसंकल्पामुळे शेतकऱ्यांची नाराजी असून, शेतकऱ्यांच्या कुठल्याच योजनांसाठी भरीव तरतूद सरकारने केली नाही. तेलबिया बाबत हमी नाही, तसेच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या मनरेगा योजनेसाठी कुठलीही घोषणा नाही. सरकारने गरिबांसाठी काहीही केलं नाही, अशी टीका रविकांत तुपकर यांनी केली.
Navneet Rana on Budget: शेतकऱ्यांसाठी सर्वात चांगलं बजेट, घरं, रेल्वे, 1 लाख कोटी महाराष्ट्राला
Union Budget 2022 : कुठे दिलासा, कुठे निराशा; लोकसभेत सादर झाला आर्थिक वर्ष 2022-23 'अर्थसंकल्प'
अर्थसंकल्प नव्हे, निवडणूक संकल्प : जयंत पाटील
अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!#Budget2022
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 1, 2022