Budget 2021 Income Tax Slabs | असे आहेत करदात्यांना भरावे लागणारे टॅक्स स्लॅब
भारतात आयकरासंबंधी दोन प्रकारचे टॅक्स स्लॅब (Income Tax Slabs) आहेत. जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये वयोगटानुसार वेगवेगळे कर लावण्यात आले आहेत तर नव्या टॅक्स स्लॅबनुसाल सर्वांवर एकसमान कर लावण्यात आला आहे.
नवी दिल्ली: अर्थसंकल्प संसदेत सादर करताना सामान्य लोकांचे लक्ष सर्वप्रथम आयकरासंबधीच्या टॅक्स स्लॅबवर जाते. भारतात सध्या हा टॅक्स स्लॅब दोन प्रकारचा आहे. एक म्हणजे नवीन टॅक्स स्लॅब आणि दुसरा जुना टॅक्स स्लॅब. अर्थसंकल्पात आयकरावर चर्चा करताना प्रत्येक वयोगटातील नागरिकांच्या उत्पन्नावर ध्यान दिलं जातं.
नव्या टॅक्स स्लॅबमध्ये सर्व वयाच्या नागरिकांवर एकसमान कर लावण्यात आला आहे. जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये याचे 60 वर्षापेक्षा कमी वयोगटातील, 60 ते 80 वयोगटातील आणि 80 वर्षावरील नागरिक असे तीन प्रकार पडतात. आता करदात्यांनी या दोन प्रकारांपैकी एक प्रकाराची निवड करायची असते.
जुना टॅक्स स्लॅब या मध्ये तीन प्रकार पडतात. 60 वर्षाखालील लोकांना 2.5 लाखांच्या उत्पन्नापर्यंत कोणताही कर लागत नाही. 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर द्यावा लागतो तर 5 लाख ते 10 लाखांपर्यंत 10 टक्के कर द्यावा लागतो. ज्यांचे उत्पन्न 10 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना 30 टक्के कर द्यावा लागतो.
Union Budget 2021: किती आहेत अर्थसंकल्पाचे प्रकार? त्या बद्दल सर्वकाही...
ज्यांचे वय 60 ते 80 इतकं आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं आहे. या वयोगटातील ज्यांचे उत्पन्न 3 लाख ते 5 लाख इतकं आहे, त्यांना 5 टक्के कर भरावा लागतो. 5 लाख ते 10 लाख उत्पन्न असलेल्या लोकांना 20 टक्के कर भरावा लागतो. तर 10 लाखांच्या वर उत्पन्न असलेल्या लोकांना 30 टक्के कर द्यावा लागतो.
ज्यांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना 5 लाख रुपयांच्या उत्पन्नापर्यंत कोणताही कर द्यावा लागत नाही. 5 लाख ते 10 लाख उत्पन्नगटातील लोकांना 20 टक्के तर 10 लाखांवर उत्पन्न असणाऱ्या लोकांना 30 टक्के कर द्यावा लागतो.
नवा टॅक्स स्लॅब, सर्व वयोगटांना एकच कर या प्रकारात सर्व वयोगटातील लोकांना एकसमान कर द्यावा लागतो. नव्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही वेगळा वयोगट पाडण्यात आला नाही. या पद्धतीत सर्वांना 2.5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्ती आहे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख ते 5 लाख आहे त्यांना 5 टक्के कर तर 5 लाख ते 7.5 लाखांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर लावण्यात आला आहे. 7.5 लाख ते 10 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के तर 10 लाख ते 12.5 लाखांवर 20 टक्के कर द्यावा लागतो. उत्पन्न 12.5 लाख ते 15 लाख असेल तर 25 टक्के आणि 15 लाखांवरील उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागतो.
दोन टॅक्स स्लॅबमध्ये काय फरक आहे? नवीन टॅक्स स्लॅबची निवड करण्याऱ्यांना आयकर नियम 80 C च्या अंतर्गत मिळणारे डिडक्शन किंवा हाउस रेन्ट अलाउंस सारखी मूभा मिळत नाहीत. जुन्या टॅक्स स्लॅबची निवड करणाऱ्यांना या सर्व प्रकारच्या मूभा मिळतात.
Budget 2021: अर्थसंकल्पाबद्दल प्रत्येकाला माहित असाव्यात अशा या अकरा रंजक गोष्टी