एक्स्प्लोर

Bitcoin : बिटकॉईनची रेकॉर्ड ब्रेक किंमत 56 हजार डॉलर्सवर, दोन वर्षांनंतर मागणी पुन्हा का वाढते? 

Bitcoin Record High : गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने घसरणाऱ्या बिटकॉईनच्या किमती आता सावरायला सुरूवात झाली असून सध्या ती पुन्हा एकदा मोठ्या स्तरावर पोहोचली आहे. 

Bitcoin : क्रिप्टोकरन्सीच्या (Cryptocurrency) गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी असून बिटकॉईनच्या किमतीने मोठी झेप घेतली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनची किंमत 24 फेब्रुवारी रोजी 56 हजार डॉलर्सवर पोहोचली आहे. तब्बल 26 महिन्यांनंतर म्हणजेच दोन वर्षे आणि दोन महिन्यांनंतर या किमतीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. डिसेंबर 2021 मध्ये किमतीने इतका मोठा स्तर गाठला होता. त्या आधी नोव्हेंबर 2021 मध्ये, बिटकॉइनने 69,000 डॉलर्स असा सर्वकालीन उच्च दर गाठला होता.त्यानतर त्यामध्ये मोठी घसरण सुरू झाली. 

बिटकॉइन पुन्हा का वाढत आहे?

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, बिटकॉइनमध्ये या वाढीचे कारण म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETF) द्वारे शाश्वत गुंतवणूकदारांच्या मागणीत सतत होणारी वाढ. मजबूत ETF प्रवाहामुळे गुंतवणूकदारांचा पुन्हा एकदा क्रिप्टोकरन्सीकडे कल वाढला आहे.

आजची बिटकॉइन किंमत

बिटकॉइन सध्या 9.26 टक्क्यांच्या वाढीसह प्रति टोकन 56,062.02 डॉलर्स इतकी आहे. 

एक्सचेंज ट्रेडेड फंडांद्वारे बिटकॉइनच्या किमतीमध्ये वाढ

गेल्या महिन्यात, गुंतवणूकदारांनी ETF मध्ये क्रिप्टोकरन्सी ETF मध्ये 5 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली. बिटकॉइन ईटीएफला अमेरिकेतील सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC) मान्यता दिली आहे. यानंतर नवीन गुंतवणूकदारांनी बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे अपेक्षित होते आणि तेच होत आहे.  त्याचे मूल्य आणखी वाढण्याचे एक प्रमुख कारण एक्सचेंज ट्रेडेड फंडांच्या रूपात समोर आले आहे. 

22 जानेवारी रोजी 35,000 डॉलर्सच्या खाली असलेली पातळी दिसून आली होती. त्यात आता मोठी वाढ झाली आहे. 22 जानेवारी हा बिटकॉइनच्या घसरणीचा एक मोठा दिवस होता. सात आठवड्यांतील सर्वात कमी पातळीवर गेला होता.

बिटकॉइन ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी आहे

लोक सहसा बिटकॉइनच्या दराबद्दल उत्सुक असतात कारण ही उच्च जोखीम-उच्च परताव्याची मालमत्ता आहे. 2010 आणि 2020 या वर्षांमध्ये, त्याने 90,00,000 टक्के (स्रोत-CoinDesk) परतावा दिला आहे जो असाधारण आहे.

काय आहे बिटकॉइन?

बिटकॉइन ही एक व्हर्च्युअल करन्सी आहे. डॉलर,रुपया किंवा इतर चलनाचा वापर ज्या पध्दतीनं केला जातो तशाच पध्दतीनं पण डिजिटल स्वरुपात बिटकॉइनचा वापर केला जातो. ऑनलाइन पेमेंटव्यतिरिक्त डॉलर किंवा इतर चलनामध्ये याचे रुपांतर केले जाऊ शकते. याची सुरुवात 2009 साली करण्यात आली आहे. आज याचा वापर ग्लोबल पेमेंट स्वरुपात करण्यात येतोय. याच्या खरेदी आणि विक्रीसाठी एक्सचेंजदेखील आहेत.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget