देशातील 10 बड्या कंपन्यांना मोठा फटका, TCS चं 47000 कोटींचं नुकसान, तर रिलायन्स आणि HDEC ला मोठा नफा
देशातील सर्वात मोठ्या 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांना तोटा झाला आहे. या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 1.35 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे.

Stock Market : गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात (Stock Market) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं देशातील अनेक कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. देशातील सर्वात मोठ्या 10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांना तोटा झाला आहे. या सर्व कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 1.35 लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. त्यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) अव्वल स्थानावर आहे. टीसीएसला एकाच वेळी 47000 कोटींहून अधिक तोटा झाला आहे, तर रिलायन्स आणि एचडीएफसीने मोठा नफा कमावला आहे.
कोणत्या कंपन्यांचं झालं मोठं नुकसान?
TCS, भारती एअरटेल, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), इन्फोसिस, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) आणि बजाज फायनान्स यांचे बाजार भांडवल एकूण 1 लाख 35 हजार 349.93 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याउलट, रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर यांचे बाजार भांडवल वाढले. दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे 39989.72 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
या कालावधीत, टीसीएसचे मूल्यांकन 47487.4 कोटींनी घसरुन 1086547.86 कोटींवर आले. भारती एअरटेलचे बाजार भांडवल 29936.06 कोटींनी घसरून 10 74 903.87 कोटींवर आले आहे. तर बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 22806.44 कोटींनी घसरुन 544962 कोटींवर आले आहे. इन्फोसिसलाही 18694.23 कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे. ज्यामुळे त्याचे मूल्यांकन 610927.33 कोटींवर आले.
बाजार भांडवलही घसरले
अशा प्रकारे, एसबीआयचे बाजार भांडवलही 11584.43 कोटींनी घसरुन 732864.88 कोटींवर आले. आयसीआयसीआय बँकेचे मूल्यांकन 3608 कोटींनी घसरून 1050215.14 कोटींवर आले आहे आणि एलआयसीचे मूल्यांकन 1233.37 कोटींनी घसरून 559509.30 कोटींवर आले आहे.
या कंपन्यांना झाला नफा
दुसरीकडे, हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल 32013.18 कोटींनी वाढून 599462.97 कोटींवर गेले. एचडीएफसी बँकेचे बाजार भांडवल 5,946.67 कोटींनी वाढून 15,44,025.62 कोटींवर गेले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मूल्यांकन 2,029.87 कोटींनी वाढून 18,85,885.39 कोटींवर गेले आहे. बाजार मूल्याच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज अव्वल स्थानावर आहेत. त्यानंतर एचडीएफसी बँक, टीसीएस, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एलआयसी आणि बजाज फायनान्स यांचा क्रमांक लागतो.
शेअर बाजारात मोठी घसरण
गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी, शुक्रवारी, शेअर बाजारात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारपेठेतील कमकुवत संकेत आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीमुळे, दलाल स्ट्रीट लाल चिन्हाने बंद झाला.
ट्रेडिंगच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स 585.67 अंकांनी किंवा 0.72 टक्क्यांनी घसरून 80,599.91वर बंद झाला, तर निफ्टी 203 अंकांनी किंवा 0.83टक्क्यांनी घसरून 24,565.35च्या पातळीवर बंद झाला. या काळात, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब, सिप्ला आणि ओएनजीसी आणि टाटा स्टील सारख्या मोठ्या कंपन्यांच्या फार्मा स्टॉकचे शेअर्स देखील 5 टक्क्यांपर्यंत घसरले.
महत्वाच्या बातम्या:























