लाल मिरचीनं 'या' राज्यातील वातावरण केलं गरम, शेतकरी आक्रमक, बाजार समितीत केली तोडफोड
सध्या लाल मिरची (Chilli) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण लाल मिरचीच्या दरात (chilli Price) मोठी घट झाली आहे. याच मुद्यावरुन सध्या कर्नाटक (karnataka) राज्यात वादंग निर्माण झालं आहे.
Karnataka Farmers Protest : सध्या लाल मिरची (Chilli) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण लाल मिरचीच्या दरात (chilli Price) मोठी घट झाली आहे. याच मुद्यावरुन सध्या कर्नाटक (karnataka) राज्यात वादंग निर्माण झालं आहे. मिरचीच्या दरात घट झाल्यामुळं तेथील शेतकरी आक्रमक झालेत. मिरचीचे दर घसरल्यामुळं शेतकऱ्यांनी निदर्शने चालू केली आहेत. तर काही शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत हावेरी जिल्ह्यातील ब्यादगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत तोडफोड केलीय.
कर्नाटकची लाल मिरची प्रसिद्ध
मिरचीच्या दरात घट झाल्यामुळ शेतकरी आक्रमक झाले आहेत. काही शेतकऱ्यांनी ब्यादगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेत तोडफोड केलीय. कर्नाटकची लाल मिरची प्रसिद्ध आहे. या मिरचीला देशासह परदेशातही मोठी मागणी आहे. मात्र, अचानक मिरचीच्या दरात घसरण झालीय. त्यामुळं शेतकरी आक्रमक झालेत. बाजार समितीत तोडफोड करत काही शेतकऱ्यांनी वाहनांची तोडफोड देखील केलीय. तसेच प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केलीय.
आठवडभरातच मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल 10 ते 15 हजार रुपयांची घसरण
मिळालेल्या माहितीनुसार आठवडभरातच मिरचीच्या दरात प्रतिक्विंटल 10 ते 15 हजार रुपयांची घसरण झालीय. याचा मोठा फटका लाल मिरची उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. ब्यादगी कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होत असते. तसेच या समितीत मिरचीला चांगला दरही मिळतो. काल बाजार समितीत 3.1 लाख पोती लाल मिरचीची आवक झाली. त्यामुळं दरातही घसरण झाली. दरम्यान, बाजारात आलेल्या लाल मिरचीचा दर्जा खराब असल्यामुळं दरात घसरण झाल्याचे बोललं जात आहे.
लाल मिरचीच्या दरात नेमकी घसरण का झाली?
सध्या मिरचीच्या दरात 10 ते 15 हजार रुपयांची घसरण झालीय. म्हणजे सध्या लाला मिरचीा बाजारा प्रतिक्विंटलला 35,000 रुपयांचा दर मिळत आहे. मागील वर्षीचा विचार केला तर मिरचीला 50 हजार रुपये प्रतिक्विंटलला दर मिळत होता. मात्र, यावर्षी दरात मोठी घसरण झालीय. दरम्यान, यावर्षी मिरचीच्या लागवडीत देखील वाढ झालीय. अचानक बाजारात मिरचीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळं दरात घसरण झाल्याचं बोललं जात आहे. डिसेंबर 2023 मध्ये मिरचीचा दर हा 44 हजार रुपये प्रतिक्विंटल होता. तो आता 35 हजार रुपयांवर आला आहे. मिरचीच दोन प्रकार प्रसिद्ध आहेत. यामध्ये कड्डी मिरची आणि गुंटूर मिरची. याची कड्डी मिरचीचा दर हा 43,000 प्रतिक्विंटलवरुन 31500 रुपये प्रतिक्विंटलवर आला आहे. तर गुंटूर मिरचीचा दर हा 16000 रुपयावरुन 12000 रुपयांवर आला आहे.
महत्वाच्या बातम्या: