एक्स्प्लोर

पाच वर्षांत दिले तब्बल 2128 टक्क्यांनी रिटर्न्स, सलमान खान ब्रँड ॲम्बेसिडर असलेल्या कंपनीचा बोलबाला!

गेल्या काही वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिलेले आहेत. या कंपनीत गुंतवणूक करणारे आज चांगलेच मालमाल झाले आहेत.

Multibagger Stock: गुंतवणुकीसाठी तुम्ही जबरदस्त रिटर्न्स देणाऱ्या स्टॉकच्या शोधात असाल तर GRM Overseas हा शेअर योग्य पर्याय ठरू शकतो. या कंपनीकडून बासमती तांदळाची निर्यात केली जाते. ही कंपनी भारतातील FMCG क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. गेल्या काही काळात या कंपनीत प्रमोटर्स तसेच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) आपली गुंतवणूक वाढवलेली आहे. 

0.38 टक्क्यांनी किरकोळ घसरण

GRM Overseas या कंपनीने नुकतेच बॉलिवुडचा सुपरस्टार सलमान खान याला सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसिडर) म्हणून करारबद्ध केलेले आहे. गेल्या शुक्रवारी मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये 0.38 टक्क्यांनी किरकोळ घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारी या कंपनीच्या शेअरचे मूल्य 262.80 रुपये होते. या कंपनीचे बाजार भांडवल 1576.80 कोटी रुपये आहे.

FII तसेच प्रमोटर्सने वाढवली गुंतवणूक 

जून 2024 तिमाहीपर्यंत प्रमोटर्सने या कंपनीचे 73,000 शेअर्स खरेदी केले. ज्यामुळे प्रमोटर्सची या कंपनीतील हिस्सेदारी 72.29 टक्क्यांपर्यंत वाढली. मार्च 2024 पर्यंत ही हिस्सेदारी 72.16 टक्के होती. यासह परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनाही या कंपनीतील आपली गुंतवणूक वाढवलेली आहे. गुंतवणुकीचे हे प्रमाण 0.67 टक्क्यंपर्यंत वाढली आहे. मार्च 2024 पर्यंत ही हिस्सेदारी 0.26 टक्के होती. या कंपनीची 27.05 टक्के मालकी ही जनतेकड आहे. 

GRM Overseas शेअरचा ROE 18.3 टक्के आणि ROCE 12.9 टक्के आहे. कंपनीचा डेट-टू-इक्विटी रेशो 1.28  आहे. या शेअरचे PE प्रणाण 30.5 रुपये आहे. या कंपनीत प्रमोटर्सच्या गुंतवणुकीचे प्रमाण चांगलेच आहे. त्यामुळे ही एक सकारात्मक बाब म्हणायला हवी.

तिमाही निकालात नेमकं काय? 

या कंपनीच्या तिमाही निकालाचा विचार करायचा झाला तर Q1FY25 मध्ये या कंपनीने 18 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवलेला आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत हे प्रमाण 17.4  कोटी रुपयांनी अधिक आहे. कंपनीच्या मिळकतीत 15 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. 30 जून 2024 पर्यंत या कंपनीचा महसूल 370 कोटी रुपयांपर्यंत वाढला होता. गेल्या वर्षात याच काळात कंपनीचा महसूल 320 कोटी रुपये होता.  

GRM Overseas ने दिले 262,800 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स 

गेल्या एका महिन्यात GRM Overseas या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांनी परतावा दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत परताव्याचे हे प्रमाण 47 टक्के आहे. वर्षभराची तुलना करायची झाल्यास हा परतावा 37 टक्के आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीने गुंतवणूकदारांना 2128 टक्क्यांनी रिटर्न्स दिले आहेत. वीस वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 262,800 टक्के महारिटर्न्स दिले आहेत. 

 (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेही वाचा :

जन्माष्टमीला शेअर बाजार बंद असेल का? जाणून घ्या 26 ऑगस्टला स्टॉक मार्केट बंद की चालू?

1 लाखाचे झाले 76 लाख, चार वर्षांत तब्बल 7530 टक्क्यांनी रिटर्न्स; 'ही' कंपनी तुम्हाला करू शकते श्रीमंत?

महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या 'लखपती दीदी' योजना आहे तरी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget