'या' देशात पाण्याच्या ऐवजी बिअर पितात! वर्षभरात एक व्यक्ती रिचवतो 140 लिटर बिअर, भारतात काय स्थिती?
Beer Consumption : बिअरच्या दरडोई वापराच्या बाबतीत जगातील पहिल्या 10 देशांपैकी नऊ देश युरोपमधील आहेत. सर्वाधिक बिअर प्राशन करणाऱ्या देशाच्या यादीत भारताचे स्थान तळाचे आहे.
Beer Consumption : जगभरात बिअरचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. काही देशांमध्ये बिअर पिणे ही सामान्य बाब समजली जाते. तर काही ठिकाणी बिअर ही पाण्यासारखी प्यायली जाते. झेक प्रजासत्ताक या देशात सर्वाधिक बिअर प्राशन केली जाते. या युरोपीयन देशात दरडोई बिअरचा वापर 140 लिटर आहे. बिअरच्या दरडोई वापराच्या बाबतीत जगातील पहिल्या 10 देशांपैकी नऊ देश युरोपमधील आहेत. नामिबिया हा एकमेव गैर-युरोपियन देश पहिल्या दहांमध्ये आहे. या आफ्रिकन देशात दरडोई बिअरचा वार्षिक वापर 95.5 लिटर आहे. या यादीत मात्र, भारत तळाच्या स्थानी आहे. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. इंडोनेशियामध्ये दरडोई बिअरचा वापर सगळ्यात कमी आहे.
वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार (World of Statistics), दरडोई बिअरच्या वार्षिक वापराच्या बाबतीत ऑस्ट्रिया हा देश झेक प्रजासत्ताक नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या देशातील प्रत्येक व्यक्ती एका वर्षात 107.8 लिटर बिअर प्राशन करते. तिसऱ्या क्रमांकावर रोमानिया आहे. या देशात बिअरचा दरडोई वार्षिक वापर 100.3 लिटर आहे. त्यापाठोपाठ जर्मनी (99 लिटर), पोलंड (97.7 लिटर), नामिबिया (95.5 लिटर), आयर्लंड (92.9 लिटर), स्पेन (88.8 लिटर), क्रोएशिया (85.5 लिटर), लाटविया (81.4 लिटर), एस्टोनिया (80.5 लिटर) या देशांचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियामध्ये ते 75.1 लिटर, अमेरिकेत 72.7 लिटर आणि मेक्सिकोमध्ये 70.5 लिटर सरासरी एक व्यक्ती रिचवतो.
Beer consumption per capita (liters per year):
— World of Statistics (@stats_feed) December 21, 2023
🇨🇿 Czechia: 140.0
🇦🇹 Austria: 107.8
🇷🇴 Romania: 100.3
🇩🇪 Germany: 99.0
🇵🇱 Poland: 97.7
🇳🇦 Namibia: 95.5
🇮🇪 Ireland: 92.9
🇪🇸 Spain: 88.8
🇭🇷 Croatia: 85.5
🇱🇻 Latvia: 81.4
🇪🇪 Estonia: 80.5
🇸🇮 Slovenia: 80.0
🇳🇱 Netherlands: 79.3
🇧🇬…
भारतात बिअरचा खप किती?
दरडोई दरडोई वार्षिक बीअर वापराच्या बाबतीत भारताचा जगात तळापासून दुसरा क्रमांक लागतो. भारतात सरासरी प्रत्येक व्यक्ती वर्षभरात फक्त दोन लिटर बिअर पितात. इंडोनेशियामध्ये हा आकडा केवळ 0.7 लिटर आहे. मलेशियामध्ये 5.8 लिटर, तुर्कीमध्ये 10.9 लिटर, इस्रायलमध्ये 17.4 लिटर, सिंगापूरमध्ये 20.9 लिटर, थायलंडमध्ये 27 लिटर, चीनमध्ये 29 लिटर, इटलीमध्ये 31 लिटर, फ्रान्समध्ये 33 लिटर, जपानमध्ये 38.4 लिटर, 39 मध्ये 39 लिटर आहे. दक्षिण कोरिया. लिटर, कॅनडामध्ये 53.3 लिटर, पोर्तुगालमध्ये 54.9 लिटर, स्वित्झर्लंडमध्ये 55.1 लिटर, रशियामध्ये 57.7 लिटर, ब्राझीलमध्ये 58.4 लिटर, डेन्मार्कमध्ये 59.8 लीटर, दक्षिण आफ्रिकेत 60.1 लिटर, न्यूझीलंडमध्ये 61.9 लिटर, न्यूझीलंडमध्ये 61 लिटर, बेल्जियममध्ये 65.9 लिटर बिअर प्रति व्यक्ती रिचवली जाते.
(Disclaimer : मद्य, अल्कोहोल प्राशन करणे हे आरोग्यास हानीकारक आहे. ही बातमी फक्त वाचकांच्या माहितीसाठी आहे. मद्यसेवनाला पाठिंबा अथवा त्याला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही.)