Bank Strike : बँक खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांचा केंद्राविरोधात एल्गार; आजपासून दोन दिवसांचा संप
Bank Strike : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
Bank Strike : सार्वजनिक बँकाच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी आजपासून दोन दिवसांचा संप पुकारला (Bank Strike)आहे. देशातील सार्वजनिक बँकांचे कर्मचारी गुरुवारी आणि शुक्रवारी संपावर आहे. या संपामुळे बँकांमधील दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU-United Forum of Bank Unions) संपाची हाक दिली आहे. महाराष्ट्रासह देशभरात या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात केली होती घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे. केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील काही मोजक्याच बँका ठेवणार आहे. इतर बँकांचे विलनीकरण अथवा खासगीकरण करण्याचे सूतोवाच याआधीच करण्यात आले आहे.
पगारवाढीसह नव्हे तर लोकांसाठी संप
हा संप देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बँकिंग अधिकाराचे हनन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातून बँक उद्योग गेल्यास याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना अधिक बसणार आहे. या देशातील सामान्य नागरिकांचे बँकिंग अधिकार आणि त्याद्वारे आर्थिक विकासासाठी मिळणाऱ्या सोयी सवलती वाचवण्यासाठी असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- भारतात सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले विकासासाठी ७६ हजार कोटींच्या योजनेला मंजुरी
- SBI च्या प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी घेतलेल्या पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर, कसा पाहाल निकाल?
- LICचे पॉलिसीधारक आहात, IPO साठी इच्छुक असाल तर 'हे' काम आधी करा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha