एक्स्प्लोर

देशातील सर्वात मोठ्या बँकांचा ग्राहकांना मोठा धक्का, थेट खातेदारांच्या उत्पन्नावर परिणाम, जाणून घ्या सविस्तर माहिती  

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, अनेक मोठ्या बँकांनी त्यांच्या बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत.

Bank : देशातील मोठ्या बँकांनी बचत खातेधारकांना मोठा धक्का दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केल्यानंतर, अनेक मोठ्या बँकांनी त्यांच्या बचत खात्यांवरील व्याजदर कमी केले आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), खासगी क्षेत्रातील दिग्गज HDFC बँक आणि ICICI बँक यांचा समावेश आहे. या बदलामुळे, बचत खातेधारकांना आता पूर्वीपेक्षा कमी परतावा मिळणार आहे. कारण काही बँकांनी सर्व बॅलन्स स्लॅबसाठी एकसमान कमी व्याजदर लागू केला आहे.

SBI ने बचत खात्यांचा व्याजदर एकसमान केले

देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या बचत खात्यांचे व्याजदर बदलले आहेत. आता सर्व बचत खातेधारकांना, त्यांची बॅलन्स काहीही असो, दरवर्षी 2.5 टक्के एकसमान व्याजदर मिळेल. हा नवीन नियम 15 जून 2025 पासून लागू झाला आहे. पूर्वी, एसबीआय 10 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.7 टक्के आणि 10 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेवर 3 टक्के व्याज देत असे, परंतु आता बँकेने सर्व बॅलन्स स्लॅबसाठी व्याजदर एकसमान केला आहे. याचा अर्थ असा की जर तुमच्या खात्यात 10 लाख रुपये किंवा 50 कोटी रुपये असतील तर आता तुम्हाला फक्त 2.5 टक्के व्याज मिळेल.

या बदलामुळे ज्यांच्या खात्यात मोठी रक्कम आहे त्यांना अधिक नुकसान होईल, कारण पूर्वी त्यांना जास्त व्याज मिळत होते. लहान खातेधारकांसाठीही 0.2 टक्क्यांची कपातही छोटी बाब नाही. जर तुमच्या खात्यात 1 लाख रुपये असतील तर पूर्वी तुम्हाला दरवर्षी 2700 रुपये व्याज मिळत असे, जे आता 2500 रुपये केले जाईल. म्हणजेच दरवर्षी 200 रुपयांचे नुकसान होणार आहे. 

एचडीएफसी बँकेनेही व्याजदर कमी केले 

खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसी बँकही या शर्यतीत मागे नाही. बँकेने 10 जून 2025 पासून आपल्या बचत खात्यांचे व्याजदर बदलले आहेत. यापूर्वी 50 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.75 टक्के आणि 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर 3.25 टक्के व्याजदर उपलब्ध होता, परंतु आता बँकेने 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेवर व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी करून 2.75 टक्के केला आहे. म्हणजेच, आता तुमच्या खात्यात 10 लाख रुपये असोत किंवा 1 कोटी रुपये, तुम्हाला 2.75 टक्क्यांचा एकसमान व्याजदर मिळेल.

आयसीआयसीआयनेही एकसमान व्याजदर सूत्र स्वीकारले 

आयसीआयसीआय बँकेनेही आपल्या बचत खात्यांचे व्याजदर कमी केले आहेत. हा बदल 12 जून 2025 पासून लागू झाला आहे. पूर्वी 50 लाख रुपयांपेक्षा कमी रकमेवर 2.75 टक्के आणि 50 लाख किंवा त्याहून अधिक रकमेवर 3.25 टक्के व्याजदर होता, परंतु आता बँकेने 50 लाख रुपये आणि त्याहून अधिक रकमेवर व्याजदर 50 बेसिस पॉइंट्सने कमी करून 2.75 टक्के केला आहे. म्हणजेच, आता सर्व बचत खात्यांवर, शिल्लक काहीही असो, 2.75 टक्क्याचा एकसमान व्याजदर लागू होईल. याचा अर्थ असा की जर तुमच्या खात्यात 75 लाख रुपये असतील, तर पूर्वी तुम्हाला वार्षिक 2.43 लाख रुपये व्याज मिळत होते, जे आता 2.06 लाख रुपये होईल. म्हणजेच दरवर्षी 37500 रुपयांचा तोटा होणार आहे.

इतर बँकांनीही व्याजदरात केली कपात 

एसबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय व्यतिरिक्त, इतर अनेक बँकांनीही त्यांच्या बचत खात्यांचे व्याजदर बदलले आहेत. 

बँक ऑफ बडोदाचे नवीन व्याजदर

बँक ऑफ बडोदाने 12 जून 2025  पासून त्यांच्या बचत खात्यांचे व्याजदर सुधारित केले आहेत. तथापि, बँक अजूनही बॅलन्स स्लॅबनुसार वेगवेगळे व्याजदर देते जे 2.7 % ते 4.25 % पर्यंत असतात. याचा अर्थ असा की जर तुमच्या खात्यात जास्त बॅलन्स असेल तर तुम्हाला अधिक व्याज मिळू शकते.

फेडरल बँक व्याजदर

फेडरल बँकेने 17 जून 2025 पासून त्यांच्या बचत खात्यांचे व्याजदर सुधारित केले आहेत. बॅलन्स स्लॅबनुसार बँक 2.5 % ते 6.25 % पर्यंत व्याजदर देत आहे.

इंडसइंड बँक व्याजदर

इंडसइंड बँकेने 16 जून 2025 पासून त्यांच्या बचत खात्यांचे व्याजदर देखील सुधारित केले आहेत. बॅलन्स स्लॅबनुसार बँक 3 % ते 5% पर्यंत व्याजदर देत आहे.

आरबीएल बँकेचे व्याजदर

आरबीएल बँकेने 16 जून 2025 पासून त्यांच्या बचत खात्यांचे व्याजदर देखील बदलले आहेत. बॅलन्स स्लॅबनुसार बँक 3 % ते 6.75 % पर्यंत व्याजदर देत आहे.

आरबीआयच्या रेपो दर कपातीचा परिणाम

जून 2025 मध्ये आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली होती, त्यानंतर बँकांनी त्यांचे व्याजदर बदलले. रेपो दर म्हणजे ज्या दराने आरबीआय बँकांना कर्ज देते. जेव्हा रेपो दर कमी असतो तेव्हा बँकांचा कर्ज घेण्याचा खर्च कमी होतो, ज्यामुळे त्यांच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवर परिणाम होतो. या कपातीचा परिणाम बचत खात्यांच्या व्याजदरांवर स्पष्टपणे दिसून येतो.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Electricity Bill : सर्वसामान्यांना 420 व्होल्टचा झटका! फॅन-लाईट तर सोडाच, घर कायमचं बंद असलं तरी भरावं लागणार वीज बिल, 'हा' प्रस्ताव लागू झाला तर खिशाला भुर्डंद
सर्वसामान्यांना 420 व्होल्टचा झटका! फॅन-लाईट तर सोडाच, घर कायमचं बंद असलं तरी भरावं लागणार वीज बिल, 'हा' प्रस्ताव लागू झाला तर खिशाला भुर्डंद
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  
तेल कंपन्यांना दररोज 1 हजार 380 कोटींचा तोटा, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी वाढ होणार का?  

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meta Layoffs : मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
मेटाने कामावरुन काढलं, कर्मचाऱ्यांनी स्नॅक्स-कोड्रिंकपासून चार्जरपर्यंत सर्वकाही लुटलं, बॅग भरभरून नेल्या
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Embed widget